नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : विरोधकांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध करताना राज्यसभेत मंगळवारी जोरदार गदारोळ (opposition parties ruckus in House) घातला. काही खासदारांनी तर चक्क बाकावर उभे राहत विरोध दर्शवला. या संपूर्ण घटनेनंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu) हे आज सभागृहात भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी झालेल्या गोंधळावर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी उभे राहून या गोंधळावर दु:ख व्यक्कत केलं. इतकेच नाही तर त्यांनी म्हटलं, विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे मला रात्रभर झोप लागली नाही.
भावूक झालेल्या व्यंकय्या नायडूंनी म्हंटलं, "काही सदस्यांनी सभागृहाचे अपवित्र चित्रीकरण केले आणि सोशल मीडियात फोटो पोस्ट केले ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सभागृहाची प्रतिष्ठा कशी भंग होते हे त्यांनी जनतेला दाखवून दिले. हा काही सदस्यांमध्ये स्पर्धात्मक आणि आक्रमक म्हणून स्वत:ला सादर करण्याच्या स्पर्धेचा परिणाम आहे."
Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu gets emotional as he speaks about yesterday's ruckus by Opposition MPs in the House
All sacredness of this House was destroyed yesterday when some members sat on the tables and some climbed on the tables, he says pic.twitter.com/S1UagQieeS — ANI (@ANI) August 11, 2021
घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याचं स्वागत करत खासदार संभाजीराजेंनी सुचवल्या 'या' दोन सुधारणा
व्यंकय्या नायडूंनी म्हटलं, सभागृहात जे काही झालं ते खूपच वाईट घडलं, लोकशाहीसाठी लाजीरवाणी घटना आहे. संसदेतील काही खासदारांनी वेलमध्ये तसेच बाकावर उभे राहून पुस्तिका भिरकावल्या हे सर्व दृश्य पाहून मला रात्रभर झोप आली नाही.
सभागृहात गोंधळ निर्णाण करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल. मंगळवारी राज्यसभेत गोंधळाची मर्यादा ओलांडली गेली, जेव्हा एका खासदाराने बाकावर चढून नियम पुस्तिका भिरकावली त्यानंतर वारंवार सभागृहाच्या कामकाजात गोंधळ घालण्यात आला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Parliament session