मुंबई, 24 मार्च: काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण (Maharashtra School Department) विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा (schools open with 100%) सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू राहणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरू राहणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुलांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीचं वेड असतं. बऱ्याचदा वर्षभरापासून कुटुंबात त्याचं प्लानिंग सुरू असतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत असं करीन..उन्हाळ्याच्या सुट्टीत तसं करूया…अशी अनेक तयारी सुरू असते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीमुळे विद्यार्थी हिरमुसले होते. मात्र शिक्षण आयुक्तांच्या अपडेटमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा- JOB ALERT: राज्यातील ‘या’ जिल्हा परिषदेत 50,000 रुपये पगाराची नोकरी; ई-मेलवर लगेच करा अर्ज देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.