मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Engineersसाठी सुवर्णसंधी! महारत्न कंपनी BHEL नागपूर इथे तब्बल 71,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

Engineersसाठी सुवर्णसंधी! महारत्न कंपनी BHEL नागपूर इथे तब्बल 71,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड GDMO भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड GDMO भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आणि 10 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 29 नोव्हेंबर: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electrical Limited Nagpur) इथे लवकरच इंजिनिअरिंगच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BHEL Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अभियंता (FTA-सिव्हिल), पर्यवेक्षक (FTA-सिव्हिल) या पदांसाठी ही भरती (BHEL Recruitment for Engineers 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आणि 10 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

अभियंता FTA-सिव्हिल (Engineer (FTA-Civil))

पर्यवेक्षक FTA-सिव्हिल (Supervisor (FTA-Civil))

एकूण जागा - 16

शैक्षणिक पात्रता

अभियंता FTA-सिव्हिल (Engineer (FTA-Civil)) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पूर्णवेळ पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील 5 वर्षांची एकात्मिक पदव्युत्तर पदवी घेतली आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान 2 वर्षांचा संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

IT क्षेत्रात पडणार Jobs चा पाऊस! 'ही' IT कंपनी देणार 65,000 Jobs; वाचा सविस्तर

पर्यवेक्षक FTA-सिव्हिल (Supervisor (FTA-Civil)) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएससाठी किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पूर्ण-वेळ डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

तसंच SC/ST उमेदवारांसाठी एकूण 50% गुण आणि किमान 2 वर्षांचा संबंधित पदांचा पात्रता अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

अभियंता FTA-सिव्हिल (Engineer (FTA-Civil)) - 71,040/- रुपये प्रतिमहिना

पर्यवेक्षक FTA-सिव्हिल (Supervisor (FTA-Civil)) - 39,670/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा

अभियंता FTA-सिव्हिल (Engineer (FTA-Civil)) - उमेदवारांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त नको. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

पर्यवेक्षक FTA-सिव्हिल (Supervisor (FTA-Civil)) - उमेदवारांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त नको. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) भेल, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 345 किंग्सवे, नागपूर – 440001

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 07 डिसेंबर 2021.

नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने असं काही केलं, की तीन तासांमध्ये आल्या अनेक ऑफर्स

ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 10 डिसेंबर 2021

JOB TITLEBHEL Nagpur Recruitment 2021
या जागांसाठी भरतीअभियंता FTA-सिव्हिल (Engineer (FTA-Civil)) पर्यवेक्षक FTA-सिव्हिल (Supervisor (FTA-Civil)) एकूण जागा - 16
शैक्षणिक पात्रता अभियंता FTA-सिव्हिल (Engineer (FTA-Civil)) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पूर्णवेळ पदवी घेतली असणं आवश्यक आहे. किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील 5 वर्षांची एकात्मिक पदव्युत्तर पदवी घेतली आवश्यक आहे. उमेदवारांना किमान 2 वर्षांचा संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. पर्यवेक्षक FTA-सिव्हिल (Supervisor (FTA-Civil)) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएससाठी किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पूर्ण-वेळ डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST उमेदवारांसाठी एकूण 50% गुण आणि किमान 2 वर्षांचा संबंधित पदांचा पात्रता अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारअभियंता FTA-सिव्हिल (Engineer (FTA-Civil)) - 71,040/- रुपये प्रतिमहिना पर्यवेक्षक FTA-सिव्हिल (Supervisor (FTA-Civil)) - 39,670/- रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादाउमेदवारांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त नको. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्तासीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) भेल, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 345 किंग्सवे, नागपूर – 440001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pssrintapp.bhel.com:9082/FTA_Recruitment_Civil/home.jsp या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Nagpur, जॉब