Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IT क्षेत्रात पडणार Jobs चा पाऊस! 'ही' मोठी IT कंपनी करणार तब्बल 65,000 कर्मचाऱ्यांची भरती; वाचा संपूर्ण माहिती

IT क्षेत्रात पडणार Jobs चा पाऊस! 'ही' मोठी IT कंपनी करणार तब्बल 65,000 कर्मचाऱ्यांची भरती; वाचा संपूर्ण माहिती

Capgemini येत्या वर्षात तब्बल 65,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे

Capgemini येत्या वर्षात तब्बल 65,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे

Capgemini ही भारतातील आघाडीवर चालणारी IT फर्म आहे. त्यामुळे आता कंपनीनं अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 28 नोव्हेंबर: कोरोना महामारीच्या संकटाच्या काळातही IT कंपन्या जोमात सुरु होत्या. म्हणूनच आता काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी (Career in IT companies in India) देण्यास सुरुवात केली आहे. TCS, Infosys सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची भरती (TCS Mega recruitment for freshers) करण्याची घोषणा केली आहे. यात Capgemini (Capgemini Mega openings for freshers) सारखी नामांकित आणि मोठी IT कमी मागे असेल असं होऊच शकत नाही. म्हणूनच आता कंपनीनं येत्या वर्षात तब्बल 65,000 कर्मचाऱ्यांची भरती (Capgemini recruitment for 65,000 IT experts) करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Capgemini कंपनीमध्ये भारतासह 50 पेक्षा जास्त देशांमध्ये एकूण प्रमुख संख्या सुमारे 2 लाख 90,000 आहे. भारतात, या कंपनीमध्ये सुमारे 1 लाख 25,000 कर्मचारी काम करत आहेत. मोठ्या तज्ञांना करिअरची (career in Capgemini) वाढ प्रदान करत असल्याने ही भारतातील आघाडीवर चालणारी IT फर्म आहे. त्यामुळे आता कंपनीनं अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडेच, HCL Technologies ने नमूद केले आहे की ते सुमारे 60% नवीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल. आणि चालू आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 22,000 नवीन नोकर भरती करण्याची योजना आहे. दुसरीकडे, TCS 15,000 ते 18,000 महिला कर्मचार्‍यांना सामावून घेण्याची योजना आखत आहे. त्यात L&T नंही महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता Capgemini 65,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Google Career Certificate: 'या' उमेदवारांसाठी Google नं लाँच केला नवा Program

ही भरती कधी आणि कोणत्या निकषांवर केली जाईल याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. मात्र TCS, Infosys आणि Cognizant या कंपन्यांचं अनुसरण करून Capgemini कंपनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करेल असंगी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Cognizant देणार तब्बल एक लाख फ्रेशर्सना नोकरी

Cognizant या मोठ्या IT कंपनीनं येत्या काही काळातील IT क्षेत्रांतील स्पर्धा आणि स्कोप बघता TCS आणि इन्फोसिसच्या पावलावर पाऊल ठेवत तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची भरती (1 lac jobs for freshers in Cognizant) करणार असल्याची माहिती मिळतेय. ExamDaily या डिजिटल वेबसाईटनं यासंबंधीचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

First published:

Tags: Career, जॉब