मुंबई, 15 डिसेंबर: इंजिनीअरिंग (Jobs for Engineers) पास झालेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) ने इंजिनिअरिंग उत्तीर्णांसाठी प्रशिक्षणार्थी आणि प्रकल्प अभियंता पदांसाठी (Engineer jobs in Government of India) अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (BEL Recruitment 2021) सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी (How to apply for BEL Recruitment) अर्ज करण्याची प्रक्रिया 6 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. एकूण 36 रिक्त पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. चला तर जाणून घेऊया या पदभरतीबाबत डिटेल्स.
या पदांसाठी भरती
प्रोजेक्ट इंजीनिअर, सिविल – 24 पदं
प्रोजेक्ट इंजीनिअर, इलेक्ट्रिकल – 6 पदं
प्रोजेक्ट इंजीनिअर, इलेक्ट्रिकल – 6 पदं
Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग इथे वैद्यकीय पदांसाठी नोकरीची संधी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी (BEL Recruitment 2021) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित प्रवाहात चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणंही आवश्यक आहे.
उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
अधिक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांचे वय 1 डिसेंबर 2021 पासून मोजले जाईल. तसंच उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट असणार आहे.
अशी होणार निवड
या पदांसाठी (Government Jobs 2021) उमेदवारांची निवड मुलाखत आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
Job Alert: राज्यातील 'या' AIIMS मध्ये प्रोफेसर पदांच्या 32 जागांसाठी Vacancy
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2021
JOB TITLE | BEL Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | प्रोजेक्ट इंजीनिअर, सिविल – 24 पदं प्रोजेक्ट इंजीनिअर, इलेक्ट्रिकल – 6 पदं प्रोजेक्ट इंजीनिअर, इलेक्ट्रिकल – 6 पदं |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी (BEL Recruitment 2021) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित प्रवाहात चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणंही आवश्यक आहे. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. |
वयोमर्यादा | उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे |
अशी होणार निवड | मुलाखत आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे |
शेवटची तारीख | 26 डिसेंबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bel-india.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब