मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BOB Recruitment 2021: बँक ऑफ बडौदा करणार मुंबई आणि नागपुरात मोठी भरती; खाली दिलेल्या लिंकवर करा अर्ज

BOB Recruitment 2021: बँक ऑफ बडौदा करणार मुंबई आणि नागपुरात मोठी भरती; खाली दिलेल्या लिंकवर करा अर्ज

बँक ऑफ बडोदा भरती

बँक ऑफ बडोदा भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 नोव्हेंबर: बँक ऑफ बडौदा (Bank of Baroda Mumbai Jobs) मुंबई आणि नागपूर (Bank of Baroda Nagpur Jobs) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank of Baroda Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra) असणार आहे. 376 जागांसाठी ही भरती होणार असून यातील 145 जागा महाराष्ट्रासाठी असणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी अर्ज

सीनियर रिलेशनशिप मॅनेजर (Sr. Relationship Manager)

ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ( E- Wealth Relationship Manager)

1. सीनियर रिलेशनशिप मॅनेजर (Sr. Relationship Manager)

एकूण रिक्त जागा - 326

शैक्षणिक पात्रता -

AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी घेतली असणं आवश्यक.

तसंच दोन वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण असणं आवश्यक.

रेग्युलेटरी सर्टिफिकेशन्स आवश्यक.

कामाचा अनुभव - सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

वयोमर्यादा - उमेदवाराचं वय हे वयवर्षे 24 ते 35 दरम्यान असणं आवश्यक आहे. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत आहे.

IAF Recruitment: भारतीय वायुदलात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी

2. ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ( E- Wealth Relationship Manager)

एकूण रिक्त जागा - 50

शैक्षणिक पात्रता -

AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी घेतली असणं आवश्यक.

तसंच दोन वर्ष पूर्ण वेळ डिग्री किंवा डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण असणं आवश्यक.

रेग्युलेटरी सर्टिफिकेशन्स आवश्यक.

कामाचा अनुभव - सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान 1.5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. किंवा सेल्स विभागातील 1.5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा - उमेदवाराचं वय हे वयवर्षे 23 ते 35 दरम्यान असणं आवश्यक आहे. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत आहे.

अशी होणार उमेदवारांची निवड

उमेदवारांची निवड ही त्यांच्या शिक्षण आणि अनुभवानुसार तसंच मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी शिक्षण आणि अनुभव बघून काही पात्र उमेदवारांना निवडण्यात येणार आहे. या उमेदवरांची मुलाखत घेतली जाणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन पुणे इथे भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 डिसेंबर 2021

JOB TITLEBank of Baroda Recruitment 2021
या पदांसाठी अर्जसीनियर रिलेशनशिप मॅनेजर (Sr. Relationship Manager) ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ( E- Wealth Relationship Manager)
शैक्षणिक पात्रताAICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच दोन वर्ष पूर्ण वेळ डिग्री किंवा डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण असणं आवश्यक. रेग्युलेटरी सर्टिफिकेशन्स आवश्यक.
कामाचा अनुभव सीनियर रिलेशनशिप मॅनेजर (Sr. Relationship Manager) - सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ( E- Wealth Relationship Manager) - सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान 1.5 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादासीनियर रिलेशनशिप मॅनेजर (Sr. Relationship Manager) - वयवर्षे 24 ते 35 दरम्यान ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ( E- Wealth Relationship Manager) - वयवर्षे 23 ते 35 दरम्यान

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bankofbaroda.in/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Mumbai, जॉब, बँक, महाराष्ट्र