मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Indian Air Force Recruitment: भारतीय वायुदलात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

Indian Air Force Recruitment: भारतीय वायुदलात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: भारतीय वायु दलात (Indian Air Force) लवकरच 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Air Force Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कुक, एमटीएस, एलडीसी, अधीक्षक, सुतार, फायरमन आणि सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदांसाठी ही भरती (10th passed to graduate jobs in IAF) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

कुक (Cook)

एमटीएस (MTS)

एलडीसी (LDC)

अधीक्षक (Superintendent)

सुतार (Carpenter)

फायरमन (Fireman)

सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Civil mechanic Transport driver)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कुक (Cook) - प्रमाणपत्र किंवा कॅटरिंगमधील डिप्लोमासह मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण. तसेच संबंधित ट्रेडमध्ये एक वर्षाचा अनुभव

एमटीएस (MTS) - 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एलडीसी (LDC) - मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास. तसेच संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.

अधीक्षक (Superintendent) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष.

सुतार (Carpenter) - मान्यताप्राप्त संस्थेतील ट्रेडमधील ITI प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी पास.

फायरमन (Fireman) - अग्निशमन प्रशिक्षणासह 10वी पास.

सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Civil mechanic Transport driver) - उमेदवार परवान्यासह 10वी उत्तीर्ण असावा.

Teacher Recruitment 2021: शिक्षकांनो, परीक्षा न देता मिळणार नोकरी; असा करा अर्ज

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianairforce.nic.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published: