मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert! 'या' बँकेत 346 पदांसाठी मोठी भरती; असा करा नोकरीसाठी अर्ज

Job Alert! 'या' बँकेत 346 पदांसाठी मोठी भरती; असा करा नोकरीसाठी अर्ज

बँक

बँक

बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 1 ऑक्टोबर-   बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रिलेशनशिप मॅनेजरसह अनेक पदांच्या भरतीसाठी ‘बँक ऑफ बडोदा’ने अर्ज मागवले आहेत. बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या बँकेत एकूण 346 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. ‘एनडीटीव्ही इंडिया’ने या बाबत वृत्त दिलंय.बँक ऑफ बडोदाने सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल आरएम सेल्स हेड) आणि ऑपरेशन्स हेड-वेल्थ या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार 20 ऑक्टोबर 22 पर्यंत बँकेची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीप्रक्रियेद्वारे एकूण 346 रिक्त जागा भरण्याचा बँकेचा उद्देश असून, त्यातील 320 जागा सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर, 24 जागा ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, 1 जागा ग्रुप सेल्स हेड आणि 1 ऑपरेशन हेड-वेल्थ पदाची आहे.

अर्ज कसा कराल?

- bankofbaroda.in या वेबसाइटवर जा.

- होमपेजवर “Current Opportunities” वर क्लिक करा.

- तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यासमोरील "Apply Now" वर क्लिक करा.

- आवश्यक तपशील भरा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा.

- त्यानंतर तुमच्या माहितीसाठी अर्जाची एक प्रिंटआउट काढून ठेवा.

(हे वाचा:रेल्वेत नोकरी हवीये ना? मग घाई करा; अर्ज करण्यासाठीची आजची शेवटची तारीख; ही घ्या लिंक )

भरतीसाठी हे उमेदवार ठरतील पात्र

भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी 24 वर्ष ते 40 वर्ष, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी 23 ते 35 वर्ष, ग्रुप सेल्स हेड पदासाठी 31 ते 45 वर्ष, आणि ऑपरेशन्स हेड-वेल्थ पदासाठी 35 ते 50 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. उमेदवाराचं वय 1 ऑक्टोबर 2022 रोजीपर्यंतचं गृहित धरण्यात येईल.

तसंच भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रता, पगार यासह इतर महत्त्वाच्या माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या वेबसाइटवर असणारी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

इतकी फी

अर्ज फी आणि इन्टिमेशन फी (नॉन-रिफंडेबल) खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये (जीएसटी आणि ट्रान्झॅक्शन फीसह) आणि एससी / एसटी / पीडब्ल्युडी/ महिला उमेदवारांसाठी 100 रुपये (फक्त माहिती फी : नॉन-रिफंडेबल) आहे.

(हे वाचा:राज्याच्या 'या' जिल्हा परिषदेत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉबचा गोल्डन चान्स; इतका मिळेल पगार )

बँक ऑफ बडोदाने जाहीर केलेल्या या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, या भरतीप्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देणं फायद्याचं ठरेल.

First published:

Tags: Bank exam, Career opportunities