मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कृषी क्षेत्रातील उमेदवारांसाठी खूशखबर! 'या' कृषि विद्यापीठात जॉबची मोठी संधी; 35,000 रुपये मिळेल पगार

कृषी क्षेत्रातील उमेदवारांसाठी खूशखबर! 'या' कृषि विद्यापीठात जॉबची मोठी संधी; 35,000 रुपये मिळेल पगार

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी भरती

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

दापोली, 23 नोव्हेंबर: डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli) इथे लवकरच कृषी क्षेत्रातील उमेदवारांच्या (Jobs in Agriculture department Maharashtra) काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DBSKKV Ratnagiri Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ संशोधन फेलो आणि यंग प्रोफेशनल-I या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow)

यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I)

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc. इन ऍग्रीकल्चर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच ऍनिमल हसबँडरीमध्ये Ph.D. पूर्ण असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc. इन ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

किंवा डिप्लोमा इन ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

BOB Recruitment 2021: बँक ऑफ बडौदा करणार मुंबई आणि नागपुरात मोठी भरती

इतका मिळणार पगार

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow)

पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी - 31,000/- रुपये प्रतिमहिना + 10% HRA

तिसऱ्या वर्षी - 35,000/- रुपये प्रतिमहिना + 10% HRA

यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) - उमेदवाराचं वय 38 वर्षांपेक्षा जास्त नको. मात्र प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) - उमेदवाराचं वय 38 वर्षांपेक्षा जास्त नको. मात्र प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

प्रमुख अन्वेषक आणि मुख्य कृषी शास्त्रज्ञ कार्यालयात, AICRP, एकात्मिक शेती प्रणाली, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड

ZP Nanded Recruitment: जिल्हा परिषद नांदेड इथे विविध वैद्यकीय पदांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 डिसेंबर 2021

JOB TITLE DBSKKV Ratnagiri Recruitment 2021
या जागांसाठी भरतीवरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I)
शैक्षणिक पात्रता वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc. इन ऍग्रीकल्चर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ऍनिमल हसबँडरीमध्ये Ph.D. पूर्ण असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc. इन ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा इन ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी - 31,000/- रुपये प्रतिमहिना + 10% HRA तिसऱ्या वर्षी - 35,000/- रुपये प्रतिमहिना + 10% HRA यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादावरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) - उमेदवाराचं वय 38 वर्षांपेक्षा जास्त नको. मात्र प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) - उमेदवाराचं वय 38 वर्षांपेक्षा जास्त नको.
अर्ज पाठवण्याचा पत्ता

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dbskkv.org/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Agriculture, Career opportunities, जॉब