Home /News /career /

नोकरीची मोठी संधी! कोकण रेल्वेमध्ये 'या' पदांच्या 18 जागांसाठी पदभरती; जाणून घ्या पात्रतेविषयी संपूर्ण माहिती

नोकरीची मोठी संधी! कोकण रेल्वेमध्ये 'या' पदांच्या 18 जागांसाठी पदभरती; जाणून घ्या पात्रतेविषयी संपूर्ण माहिती

कोकण रेल्वे भरती

कोकण रेल्वे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021 पर्यंत असणार आहे.

    मुंबई, 08 डिसेंबर: कोकण रेल्वे (Konkan Railway Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Konkan Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. जूनियर टेक्निकल असिस्टेंट या पदांसाठी ही भरती (Railway Jobs 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021 पर्यंत असणार आहे. या पदांसाठी भरती  जूनियर टेक्निकल असिस्टेंट (Junior Technical Assistant) - एकूण जागा 18 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित प्रवाहात BE किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराला ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, रात्रभर जागून बिनधास्त करा अभ्यास; येणार नाही झोप; वाचा Tips वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे.सूट देण्यात आली आहे. अशी होणार निवड मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवार मुलाखतीच्या तारखेला सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या पदांसाठी नोंदणी करू शकतात. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता यूएसबीआरएल प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, विस्तार- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (UT), पिन-180011 Job Alert: पुण्यातील 'या' सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची मोठी संधी मुलाखतीची तारीख - 13 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021
    JOB TITLE  Konkan Railway Recruitment 2021
    या पदांसाठी भरती जूनियर टेक्निकल असिस्टेंट (Junior Technical Assistant) - एकूण जागा 18
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित प्रवाहात BE किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराला ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
    वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे.सूट देण्यात आली आहे.
    अशी होणार निवड मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवार मुलाखतीच्या तारखेला सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या पदांसाठी नोंदणी करू शकतात.
    मुलाखतीचा पत्ता यूएसबीआरएल प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, विस्तार- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (UT), पिन-180011
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://konkanrailway.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या