जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / जॉब जॉईन करण्याआधीच कंपनीचं वर्क कल्चर जाणून घ्यायचंय? मग Interview मध्ये हे 5 प्रश्न विचाराच

जॉब जॉईन करण्याआधीच कंपनीचं वर्क कल्चर जाणून घ्यायचंय? मग Interview मध्ये हे 5 प्रश्न विचाराच

job interview

job interview

बरेचदा कंपनीत इंटरव्ह्यू देताना तिथलं वातावरण कसं आहे, याची उमेदवारांना कल्पना नसते. त्यामुळे काम सुरू केल्यावर त्यात मन रमत नाही. म्हणून….

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 16 एप्रिल: करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी केवळ मेहनत नाही, तर कामाचं स्वरूप व वर्क कल्चरही चांगलं असणं गरजेचं असतं. बरेचदा कंपनीत इंटरव्ह्यू देताना तिथलं वातावरण कसं आहे, याची उमेदवारांना कल्पना नसते. त्यामुळे काम सुरू केल्यावर त्यात मन रमत नाही. म्हणून वर्क कल्चर पारखून घेण्यासाठी मुलाखतीवेळीच काही प्रश्न विचारता येऊ शकतात. Fintechfutures.com यांनी याबाबत वृत्त दिलं आहे. एखाद्या कंपनीतल्या चांगल्या वर्क कल्चरमुळे त्या कंपनीची व कर्मचाऱ्यांचीही भरभराट होते. वर्क कल्चर म्हणजे केवळ ऑफिसमधलं वातावरण नाही, तर कंपनीचे नियम, कंपनीची धोरणं, उद्दिष्टं, कर्मचाऱ्यांशी वर्तन, समाजातलं कंपनीचं स्थान व सामाजिक काम या सगळ्या गोष्टींवर वर्क कल्चर अवलंबून असतं. MIT Sloanनुसार, खराब वर्क कल्चर हे कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडण्यामागचं प्रमुख कारण असतं. कर्मचाऱ्यांच्या मनातली कंपनीशी जोडल्याची भावना आणि कामातली प्रेरणा हे आव्हानात्मक काम, व्यावसायिक प्रगती, रिमोट वर्किंग सपोर्ट, कामाचं लवचिक वेळापत्रक आणि टीमवर्क यांसह इतर काही गोष्टींनी साधता येतं. कंपनीचं वर्क कल्चर जाणून घेण्यासाठी काही प्रश्न उमेदवार कंपनीला विचारू शकतात. 7 सशस्त्र गुंडांशी तब्बल 4 तास एन्काउंटर; लोखंडवालातील ‘त्या’ शूटआऊटचे खरे हिरो; कोण होते IPS आफताब अहमद खान 1. नवे कर्मचारी कसे एकत्र जोडले जातात? एखाद्या कंपनीत काम सुरू केल्यावर सुरुवातीचे काही आठवडे खूप महत्त्वाचे असतात. कामाची ओळख, टीमसोबत जुळवून घेणं हे कंपनीत रुळण्यासाठी गरजेचं असतं. Korn Ferry यांच्या अभ्यासानुसार, 10-25 टक्के कर्मचारी पहिल्या 6 महिन्यांतच नोकरी सोडतात. Winhurst Groupच्या मते, जर कर्मचाऱ्यांना कंपनीत रूजू होताना चांगलं वातावरण मिळालं, तर 58 टक्के कर्मचारी किमान 3 वर्ष नोकरी सोडण्याचा विचार करत नाहीत. प्रॉविडंट सीआरएम ही डिजिटल सोल्युशन्स कन्सल्टन्सी कंपनीत आनंदी, चांगलं वातावरण कसं राहील यावर विशेष लक्ष देते. चांगली कंपनी निवडताना, कर्मचाऱ्यांना सुरुवातीला कंपनीकडून कसा सपोर्ट मिळतो आणि कंपनी व कर्मचारी दोघांची प्रगती कशी साधली जाते, याबाबत तुम्ही प्रश्न विचारू शकता. 4थी पास आहात? स्वयंपाकही करता येतो? मग तब्बल 52,000 रुपये मिळेल पगार; इथे लगेच करा अप्लाय 2. तुम्हाला एकत्र काम करणं आवडतं की स्वतंत्रपणे? एखाद्या कंपनीत नोकरी स्वीकारण्याआधी तुमची कामाची पद्धत कशी आहे, हे जाणून घ्या. तुम्हाला स्वतंत्रपणे काम करायला आवडतं की टीमसोबत काम करून एकत्रित उद्दिष्ट पूर्ण करायला आवडतं, हे जाणून घ्या. कंपनीमध्ये टीमसोबत, स्वतंत्रपणे की दोन्ही पद्धतीनं काम केलं जातं याची माहिती घ्या. यावर तुमची उत्पादनक्षमता वाढेल की कमी होईल हे अवलंबून असेल. 3. कंपनी समाजाला काय देते? Cone Communications च्या कर्मचाऱ्यांच्या अभ्यासानुसार, जी कंपनी कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि पर्यावरणविषयक प्रश्नांमध्ये योगदान देण्यासाठी मदत करते, त्या कंपनीशी 83 टक्के कर्मचारी निष्ठावान राहतात. त्यामुळे तुमच्यासाठी सामाजिक व पर्यावरणविषयक प्रश्न महत्त्वाचे असतील, तर कंपनीचा स्वीकार करण्याआधी कंपनीच्या ESG (Environmental, Social And Governance Concerns) धोरणांविषयी माहिती करून घ्या. उदा. अ‍ॅपवर आधारित बँक मोन्झोसारखी कंपनी अनेक चांगली उद्दिष्ट ठेवते. 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनापर्यंत पोहोचणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. तसंच समाजासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मानसिक आरोग्य संस्थांसोबत ही कंपनी काम करते. Dream 11 Recruitment: आतापर्यंत फक्त टीम बनवली आता जॉबही करण्याची संधी; Dream 11 देतंय जॉब्स 4. कर्मचाऱ्यांना कंपनीत किती महत्त्व असतं? कामाची दखल घेतली जाणं कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या मते, कंपनीत महत्त्व मिळतं असं वाटणारे 90 टक्के कर्मचारी चांगलं काम करतात व सतत कामात व्यग्र राहतात. Paypal मधील Me2You रेकग्निशन अ‍ॅवॉर्ड प्रोग्रॅममध्ये मॅनेजर्सच्या चांगल्या कामाचं कौतुक होतं. तसंच सायकल योजना किंवा वेलनेस सपोर्टसारख्या योजनांद्वारे कर्मचाऱ्यांना वर्षभर लाभ दिले जातात.

News18लोकमत
News18लोकमत

5. कंपनीत काम करायला का आवडतं? कंपनीत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना तिथे काम करायला का आवडतं, हे विचारल्यास तुम्हाला कंपनीचं वर्क कल्चर जाणून घेता येईल. वेतन, सामाजिक धोरणं, नियम या सगळ्यांबाबत जाणून घेऊन तुम्ही कंपनीत काम करू शकता का हे तुम्हाला ठरवता येईल. थोडक्यात नोकरी स्वीकारण्याआधी कंपनीतलं वर्क कल्चर व तुमच्या अपेक्षा याबाबत तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी काही प्रश्न विचारून तुम्ही योग्य कंपनीची निवड करू शकता. Link : https://www.fintechfutures.com/2022/06/fintech-futures-jobs-five-interview-questions-to-ask-to-determine-a-companys-culture/ भाग्यश्री

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात