मुंबई, 13 एप्रिल: क्रिकेटच्या चाहत्यांना Dream 11 हे मोबाईल गेमिंग अॅप माहीत असेलच. याच ड्रीम इलेव्हन कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. तुम्हाला क्रिकेटची आवड असेल तर उत्तमच, पण कंपनी सध्या क्रिकेटसंदर्भात नाही, तर दुसऱ्या विभागात उमेदवारांची भरती करत आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. कंपनी असोसिएट मॅनेजर व बिझनेस अॅनॅलिटिक्स या पदासाठी अनुभवी उमेदवार शोधत आहे. या नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. या पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करावे लागतील. या पदासाठी पात्रतेच्या अटी आणि कोणती स्कील्स आवश्यक आहेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. ‘ते’ नुसते दिसले तरी थरथर कापतात गुन्हेगार; आतापर्यंत तब्बल 60 एन्काऊंटर केलेले IPS आहेत तरी कोण? तुम्हाला काय करावं लागेल? - अॅनॅलिटिकल सोल्युशनिंग स्कील्स वापरून मोठ्या प्रमाणावर वास्तविक बिझनेस प्रॉब्लेम्स सोडवणं. - डिझाईन आणि प्रयोगांचं विश्लेषण (A/B चाचण्या, सिंथेटिक नियंत्रण इत्यादी.) आणि उत्पादन वैशिष्ट्यांना प्राधान्य देण्यासाठी मदत करणं. - डेटाद्वारे युजर्सना इनसाइट्स प्रदान करणं: युजर्सचं विभाजन, दीर्घकालीन ट्रेंड आणि वर्तणूक विश्लेषण. - ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटर्जी व प्रॉडक्ट रोडमॅप्ससाठी बिझनेस व प्रॉडक्ट टीमसोबत काम करणं. - SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करणं. जाड पिळदार मिश्या आणि दबंग पर्सनॅलिटी, ‘Iron Man’ म्हणून ओळखले जातात ‘हे’ IPS Officer, गिनीज बुकमध्येही आहे नाव या पदासाठी पात्रतेच्या अटी : - दोन वर्षांपेक्षा जास्त अॅनॅलिटिकल अनुभव. - SQLमध्ये काम करण्याचा अनुभव. - गूगल अॅनॅलिटिक्स, लूकर, PowerBI व Tableau इत्यादी टूल्समध्ये काम करण्याचा अनुभव. - पायथॉनसारख्या स्टॅटिस्टिकल अॅनॅलिसिस लँग्वेजचा अनुभव.
या पदासाठी अर्ज करण्यास तुम्ही इच्छुक असाल तर ड्रीम इलेव्हनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. वर दिलेल्या पात्रतेच्या अटी तुम्ही पूर्ण करत असाल, व तुम्हाला ड्रीम इलेव्हनमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा या संदर्भात त्यांच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली असेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई ऑफिसमधून काम करावं लागेल, असं कंपनीने ही जाहिरात प्रसिद्ध करताना म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटची आवड असली तरी तुम्हाला कंपनी भरती करत असलेल्या पदाच्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.