जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / पाचवीच्या 80 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, आठवीतील 65 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येईना, राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली

पाचवीच्या 80 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, आठवीतील 65 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येईना, राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कोरोना काळानंतर राज्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावली आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 जानेवारी : कोरोनाच्या महासंकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. यानंतर शाळा महाविद्यालयांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून शाळा महाविद्यायांचे वर्ग चालवले जात होते. मात्र, या कोरोना काळानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना काळानंतर राज्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावली आहे. पाचवीतील साधारण 80 टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी आली नाही तर 65 टक्के विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित सोडवता आले नाही. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर ‘अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) सर्वेक्षण केले. यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वक्षणात पायाभूत सुविधांची उपलब्धताही कमी झाली आहे. तसेच पाचवीतील 44 टक्के, तर आठवीतील 24 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचे मराठी वाचन येत नसल्याचे उघड झाले आहे. कोरोनाकाळापूर्वी 2018 मध्येही यासंबंधीचे सर्वेक्षण झाले होते. या सर्वेक्षण अहवालाच्या तुलनेत आता किमान क्षमता विकसित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 8 ते 10 टक्क्यांनी घटले आहे. देशभरातील शालेय शैक्षणिक परिस्थितीचे सर्वेक्षण प्रथम फाउंडेशनच्या वतीने करण्यात येते. यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वयानुसार भाषा आणि गणित या विषयांतील आवश्यक क्षमता आत्मसात केल्या आहेत का, याची पाहणी यामध्ये करण्यात आली. दरवर्षी करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात कोरोना काळात खंड पडला होता. यापूर्वी 2018-19 या शैक्षणिक वर्षात पाहणी करण्यात आली. त्यानंतर यंदा (2022-23) या वर्षातील शैक्षणिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. अहवालात धक्कादायक माहिती उघड - कोरोनाकाळात विद्यार्थी शाळांपासून दुरावले. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासावर झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसते आहे. 6 ते 14 वयाच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण एका टक्क्यापेक्षा कमी आहे, तर 15 ते 16 वयाच्या म्हणजे माध्यमिक वर्गातील साधारण 1.5 टक्के विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. हेही वाचा -  मित्रांनीही विश्वास ठेवला नाही, पण अडचणींचा सामना करुन गड्यानं मैदान मारलंच, झाला IAS दुसरीच्या विद्यार्थ्यांना साधारण 10 ते 12 साध्या सोप्या वाक्यांचा परिच्छेद वाचता येणे अपेक्षित आहे. त्यानुसार ‘एक होती आजी. एकदा तिला तिच्या बहिणीचे पत्र आले. आजीला तिने तिच्या घरी पूजेला बोलावले होते. आजीने आपल्या सामानाचे गाठोडे बांधले… ’ अशा स्वरुपाचा परिच्छेद विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देण्यात आला होता. मात्र, पाचवीच्या वर्गातील साधारण 44 टक्के आणि आठवीतील 24 टक्के विद्यार्थी तो परिच्छेद वाचू शकले नाहीत. तर आठवीतील 2.5 टक्के विद्यार्थ्यांना अक्षरेही ओळखता आली नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वजाबाकी अन् भागाकारही येईना -  या सर्वेक्षणामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा म्हणजे 41 वजा 13 करण्यास सांगण्यात आले. मात्र, अशा स्वरुपाचे गणित अवघ्या 19.6 टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले. यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात (2018) असे गणित सोडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 30.2 टक्के होते. आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आले. म्हणजे जसे की, 519 भागिले 4. मात्र, अशा स्वरुपाचे गणित सोडवू शकणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण फक्त 34.6 टक्के होते. तर यापूर्वीच्या सर्वेक्षणात म्हणजे 2018मध्ये हे प्रमाण 40.7 टक्के होते. असरचे सर्वेक्षण -  असरने महाराष्ट्रातील 33 जिल्हे, 983 गावे आणि 19396 घरे आणि 823 शाळांचे सर्वेक्षण केले. यामध्ये महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील पटसंख्या 2018 मध्ये 61.6 टक्क्यांवरून 2022 मध्ये 67.4 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर 2018 च्या 37.6 टक्क्यांवरून खाजगी शाळांमध्ये ते 32.1 टक्क्यांवर घसरले आहे. 2022 मध्ये तिसरीच्या वर्गातील सर्वेक्षण केलेल्या मुलांपैकी केवळ 26.6 टक्के मुले दुसरीच्या मजकूर वाचू शकतात. हे प्रमाण 2018 मध्ये 42.1 टक्के आणि 2017 मध्ये 40.6 टक्के होते. 2022 मध्ये दुसरीमधील केवळ 18.7 टक्के मुले मूलभूत वजाबाकी करू शकतात. 2018 मध्ये हे प्रमाण 27.1 टक्के होते. अहवालात सर्वेक्षण केलेल्या उच्च वर्गांसाठी म्हणजे पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची स्थिती हीच आहे. इयत्ता पाचवीतील केवळ 55.5 टक्के मुले दुसरीतील मजकूर वाचू शकतात. तर इयत्ता 8 मधील केवळ 76.1 टक्के मुले इयत्ता दुसरीच्या स्तरावरील मजकूर वाचू शकतात. महामारीनंतर शालेय शिक्षणात डिजिटलायझेशनची नवी लाट असतानाही, ASER अहवालात संगणक असलेल्या शाळांच्या संख्येत घट झाली आहे. तर ज्या शाळांमध्ये मुले संगणक वापरत असल्याचे निरीक्षण केले जाते त्यांची टक्केवारी नाममात्र आहे. सन 2022 मध्ये, 34.0 टक्के शाळांमध्ये संगणक आहेत तर 2018 मध्ये ही आकडेवारी 45.5 टक्के होती. परंतु संगणक वापरत असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दोन्ही वर्षांमध्ये 19 टक्के इतकीच राहिली आहे. मोबाईल फोन असणाऱ्या कुटुंबांची संख्या 2010 मध्ये केवळ 67.5 टक्के होती. ती आता 2022 मध्ये 95.1 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यापैकी 84.1 टक्के कुटुंबांकडे मोबाईल फोन आहेत. स्मार्टफोन तर 88.1 टक्के लोकांकडे इंटरनेट सुविधा आहे. यामध्ये लहान मुलांना मोबाईल फोनचा सर्वाधिक वापर होताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात