मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मित्रांनीही विश्वास ठेवला नाही, पण अडचणींचा सामना करुन गड्यानं मैदान मारलंच, झाला IAS

मित्रांनीही विश्वास ठेवला नाही, पण अडचणींचा सामना करुन गड्यानं मैदान मारलंच, झाला IAS

IAS अधिकारी हिमांशु कौशिक

IAS अधिकारी हिमांशु कौशिक

जेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना याबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि अनेकांनी त्यांना साथही दिली नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 17 जानेवारी : जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा संकल्प केलात, तर तो नक्की पूर्ण होतो. फक्त त्यासाठी गरज असते ती मेहनतीची. इंजिनिअरींग पार्श्वभूमी असलेले IAS हिमांशू कौशिक हे दिल्लीचे रहिवासी आहेत. काही काळ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. ते यशस्वी होतील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. मात्र, हिमांशू कौशिक यांनी आपल्या मेहनतीने यशाला गवसणी घातली. आज जाणून घेऊयात, IAS हिमांशू कौशिक यांचा यशस्वी प्रवास.

दिल्लीतील रहिवासी असलेल्या हिमांशू कौशिक यांनी 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे जीवन चढ-उतारांनी भरलेले आहे. ते अभ्यासात फार हुशार नव्हते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत नागरी सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्न अनेकांच्या लक्षात येत नव्हते.

IAS हिमांशू कौशिक हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील अभियंता आहेत आणि आई संस्कृत विषयाच्या शिक्षिका आहेत. हिमांशू दिल्लीत लहानाचा मोठा झाला आणि तेथून त्याचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी गाझियाबादमधील एका खासगी संस्थेतून इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. ते अभ्यासात फार हुशार नव्हते आणि दोन वेळा त्यांचे विषयही राहिले होते. यानंतर हिमांशू यांना बीटेकमध्ये 65 टक्के गुण मिळाले होते.

हिमांशू कौशिक यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून एका कंपनीत काम केले होते. त्याचवेळी त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना याबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि अनेकांनी त्यांना साथही दिली नाही. यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी कोचिंग ज्वाईन केली.

हेही वाचा - एकीकडे पेशंटच्या शस्त्रक्रिया दुसरीकडे UPSC ची तयारी; डॉक्टर तरुणीची अल्पावधीतच यशाला गवसणी

हिमांशू कौशिक यांनी कठोर परिश्रम आणि कोचिंगचे मार्गदर्शन यामुळे UPSC परीक्षेची तयारी सुरू ठेवली. आणि यानंतर 2017 मध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये 77 वा क्रमांक मिळवला होता. त्यांच्या यशाने सर्वांची तोंडे बंद झाली होती. त्याचबरोबर सामान्य विद्यार्थीही आपल्या जिद्दीच्या बळावर यूपीएससी परीक्षेत यशस्वी होऊ शकतात, हेही त्यांनी सिद्ध केले होते.

हिमांशू कौशिक यांच्या यशातून यूपीएससी परीक्षा उमेदवारांना खूप काही शिकता येईल. यावरून हे स्पष्ट होते की, प्रत्येकाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव आहे आणि त्यांनी इतरांवर अवलंबून राहू नये किंवा इतरांच्या सल्ल्यानुसार निर्णय बदलू नये. ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे आणि मेहनत करण्याची जिद्द आहे, ते कोणत्याही परिस्थितीत उत्तीर्ण होऊ शकतात. म्हणून त्यांचा हा यशस्वी प्रवास तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Ias officer, Inspiring story, Success story, Upsc, Upsc exam