मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: तब्बल 7.5 कोटींचं पॅकेज धुडकावून सुरू केलं कोचिंग; आज बनलीय देशातील युनिकॉर्न कंपनी

Success Story: तब्बल 7.5 कोटींचं पॅकेज धुडकावून सुरू केलं कोचिंग; आज बनलीय देशातील युनिकॉर्न कंपनी

अलख पांडेय

अलख पांडेय

पॅकेज धुडकावत स्वतःची ‘फिजिक्सवाला’ ही शैक्षणिक कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी देशातील 101 युनिकॉर्न कंपनीपैकी एक असून 1 अब्ज डॉलारपेक्षा अधिक त्याचे आर्थिक मूल्यांकन आहे.

    दिल्ली, 08 जून:  स्वतःवर विश्वास असेल तर कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यावर मात करून तुम्ही जगासमोर प्रेरणा निर्माण करू शकता. प्रयागराज (Prayagraj) येथील अलख पांडेय हे नाव त्यापैकीच एक आहे. बिकट कौटुंबिक परिस्थिती असल्याने भावंडांना शिक्षण देण्यासाठी वडिलांना त्यांचं राहतं घर विकावं लागलं. आपला निवारा आणि आयुष्यभर कमावलेलं धनही त्यांनी अलख व त्यांच्या बहिणीच्या शिक्षणासाठी खर्च केलं. मुळचा पिंड शिक्षकाचा असल्याने अलख यांनी आयआयटीचं शिक्षण पूर्ण करून शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना अनअ‍ॅकॅडमी कंपीने वार्षिक 4 कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर केली होती. तसंच दुसऱ्या कंपनीने 7.5 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं पण अलख यांनी ही पॅकेज धुडकावत स्वतःची ‘फिजिक्सवाला’ ही शैक्षणिक कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी देशातील 101 युनिकॉर्न कंपनीपैकी एक असून 1 अब्ज डॉलारपेक्षा अधिक त्याचे आर्थिक मूल्यांकन आहे. आज संपूर्ण देशात अलख यांचा ‘फिजिक्सवाला’ हा ब्रँड अल्पावधीत नावारूपाला आला आहे. 'आज तक हिंदी' ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. अलख सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते. कौटुंबिक स्थिती हालाखीची असताना त्याचा परिणाम त्यांनी शिक्षणावर कदापि होऊ दिला नाही. त्यांचे वडील सतीश व आई रजत यांनी अलख आणि बहीण आदिती यांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी घर विकलं. अलख यांचं शालेय शिक्षण प्रयागराजमध्ये बिशप जॉन्सन स्कूलमध्ये झालं. त्यांना 10 वीत 91% 12वीमध्ये 93.5% गुण मिळाले. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी बारावीनंतर एका कोचिंग क्लासमध्ये 3 हजार रुपये महिना मोबदल्यावर शिकवणं सुरू केलं. MH BOARD 12TH RESULT: नेहमी बोर्डाच्या निकालात मुलीच का ठरतात अव्वल? मुलं कुठे पडतात कमी? मिळेल उत्तर 2017 नंतर मिळाली खरी ओळख अलख पांडेय कानपूर आयआयटीतून (IIT Kanpur) 2015 मध्ये बी.टेक (B.tech) झाले. पदवी नंतर त्यांनी त्याच संस्थेत शिकवणं सुरू केलं. शिक्षकीपेशा अवलंबलेल्या अलख यांनी त्यांचे सहकारी मित्र प्रतीक माहेश्वरींसोबत 2017 मध्ये ‘फिजिक्सवाला’ नावाने युट्युब चॅनेलची सुरूवात केली व आपली व्हिडिओ लेक्चर अपलोड करण्यास सुरुवात केली. प्रतीक यांनीही आयआयटी बीएचयूमधून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं असून, कंपनीचे सर्व व्यवहार प्रतीक पाहतात. या कंपनीमध्ये वेस्ट ब्रीज आणि जीएसव्ही व्हेंचर्सने 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत अल्पावधीतच ते या माध्यमातून खूप प्रसिद्ध झाले. पाहतापाहता व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. कोरोना काळात सुरु केले अ‍ॅप अलख पांडेय व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या युट्युब चॅनलवर तीन वर्षं व्हिडिओ लेक्चर अपलोड केली जात होती. यानंतर कोरोना काळात त्यांनी NEET व JEE च्या विद्यार्थ्यांसाठी नवे अ‍ॅप सुरू केलं. केमिस्ट्री, फिजिक्सच्या अवघड प्रश्नांची उत्तरं येथे सहज मिळतात. हे अ‍ॅप आता खूप लोकप्रिय झालं आहे. यामुळेच फिजिक्सवाला युट्युब चॅनलचे 69 लाख subscriber झाले असून 50 लाख अ‍ॅप डाउनलोड झाले आहेत. 2020 मध्ये 'फिजिक्सवाला'ला कंपनी अ‍ॅक्टमध्ये सामील करून घेण्यात आलं आहे. आज 2022 मध्ये फिजिक्सवाला कंपनी युनिकॉर्न कंपनी झाली आहे. आपल्या यशाचं श्रेय हे वडिल सतीश पांडेय आणि मित्र प्रतीक माहेश्वरी यांचं आहे असं अलख सांगतात. MH BOARD 12TH RESULT LIVE: अपेक्षेपेक्षा मार्क्स कमी वाटताहेत? पुनर्मूल्यांकनासाठी असे करा अर्ज दरम्यान, कौटुंबिक स्थिती वाईट असली तरी ठरवल्यानंतर प्रामाणिकपणे आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने काम करत राहिल्यास यश नक्की मिळतं आणि प्रेरणादायी उदाहरण जगासमोर ठेवता येतं हे अलख यांनी दाखवून दिलं आहे.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Success story

    पुढील बातम्या