मराठी बातम्या /बातम्या /करिअर /5G मुळे सुरू होणार नोकऱ्यांचा 'दिवाळी सिझन', पाहा कोणत्या क्षेत्रात मिळतील Jobs?

5G मुळे सुरू होणार नोकऱ्यांचा 'दिवाळी सिझन', पाहा कोणत्या क्षेत्रात मिळतील Jobs?

 देशातील 5 G सेवेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे. या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे.

देशातील 5 G सेवेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे. या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे.

देशातील 5 G सेवेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे. या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 13 ऑक्टोबर :  देशातील 5 G सेवेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे. या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. मोबाइल युजर्सना आता सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा अनुभव घेता येणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे  वैद्यकीय, शिक्षण, उत्पादन आणि विज्ञानाच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 5G लाँच झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची संधी मोठ्या संख्येनं वाढणार आहे. या संदर्भात ‘टीव्ही नाईन हिंदी’नं वृत्त दिलं आहे.

  सकारात्मक काळ

  भारतात 5G मोबाइलची सेवा सुरू झाल्यानंतर रोजगाराची स्थिती नेमकी कशी असेल हे जाणून घेण्यासाठी मोठी उत्सुकता आहे. या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आलं असून, यात टेलिकॉम क्षेत्रात 13 टक्के नोकऱ्यांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली गेलीय. नोकऱ्यांबद्दल हा ट्रेंड उत्साह वाढवणारा मानला जातोय. वास्तविक पाहता देशातील प्रमुख कंपन्या 5G डिजिटल सेवा विविध शहरांत लाँच करत आहेत. डाटा सेंटरची क्षमता वाढवण्यासाठी आणि विशेष काम म्हणजेच स्पेशलाइज्ड रोलसाठी लोकांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

  मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सनुसार, आगामी तिमाहीचा काळ नवीन लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं सकारात्मक दिसत आहे. 5G लाँच झाल्यानंतर टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीची स्थिती सुधारणार आहे. आयात-निर्यात, पर्यटन आणि बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातही वृद्धी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, टियर 2 आणि टियर 3 शहरांच्या विकासासाठी सरकारने त्यांच्या नव्या धोरणावर लक्ष केंद्रीत केल्यानं रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आशा निर्माण झाली आहे.

  WhatsAppवर लवकरच येणार ‘ही’ 5 जबरदस्त फिचर्स, बदलणार चॅटिंगची शैली

  'या' क्षेत्रात मिळणार नव्या नोकऱ्या

  Monster.com चे सीईओ शेखर गार्सिया यांनी सप्टेंबर 2022 च्या नोकऱ्यांच्या ट्रेंडबाबत भाष्य करताना महत्त्वाचा खुलासा केलाय. ते म्हणाले, ‘नवीन उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी कंपन्या शाश्वत दृष्टिकोन अवलंबत आहेत. सार्वजनिक मागणी वाढल्यानं सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये वेगाने वाढ होत आहे आणि यात नोकऱ्या वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. भारत सरकारकडून 5G लाँच केल्यानंतर नोकऱ्यांच्या क्षेत्रात नवे रोजगार निर्माण होतील, असा आशेचा किरण दिसत आहे. विशेष करून डिजीटल इंडियाचा मार्ग सुकर बनवण्यासाठी टेलिकॉम क्षेत्रात अधिक नोकऱ्या निर्माण होतील.

  फेसबुकने फॉलोअर्स गोठवल्यामुळे खळबळ, कोटींचे झुकरबर्ग हजारात, नेमकं काय झालं?

  5G सेवा सुरू झाल्याने सध्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, इंटरनेट व इतर क्षेत्रांत नवीन नोकऱ्या निर्माण होतील. मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा डाटा सांभाळण्याची गरज असल्यानं सॉफ्टवेअर इंजिनीअरची मागणी वाढण्याची आशा आहे. मशीन लर्निंग एक्सपर्ट, डाटा एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, आयओटी एक्सपर्ट्सची आवश्यकता असणार आहे.

  First published:

  Tags: Mobile, Technology