शक्ति सिंह, प्रतिनिधी कोटा, 24 मे : राजस्थानच्या कोटा येथील स्टेशन परिसरात राहणारे 26 वर्षीय वीरेंद्र कुमार मीना यांनी UPSC मध्ये यश मिळवून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे वीरेंद्रला हे यश सेल्फ स्टडी करुन मिळाले. चौथ्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या वीरेंद्रने कोचिंग न करता सेल्फ स्टडी केला आणि त्यात यशस्वीपणे बाजी मारली. वीरेंद्रने ऑल इंडिया 883 वी रँक मिळवली आहे. वीरेंद्र यूपीएससी उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. तसेच निकाल लागताच त्यांच्या घरी अभिनंदनासाठी झुंबड उडाली. यूपीएससीमध्ये यश मिळवण्यावर वीरेंद्र म्हणाला की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे कठोर परिश्रम, विश्वास आणि जिद्द असायला हवी. हिंमत, धाडस आणि मेहनत घेऊन तयारी केली तर प्रत्येक परिस्थितीत यश मिळते. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मनात फक्त हिंमत असली पाहिजे.
यशासाठी अनेकवेळा अपयशाचे तोंड पाहावे लागते - वीरेंद्रने सांगितले की, तुम्हाला एकदाच यश मिळत नाही. त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतील. वारंवार अपयश आल्याने निराश होऊ नये. त्यापेक्षा मेहनत करायला हवी. यश कधीच एकाच वेळी येत नाही, त्यासाठी तुम्हाला अनेकवेळा अपयशाला सामोरे जावे लागते, पण माघार घेऊन तुमची स्वप्ने कधीच संपवू नका. वडील आहे रेल्वेमध्ये लोको पायलट - वीरेद्र मीणा या तरुणाने सांगितले की, यापूर्वी त्याने तीन वेळा प्रयत्न केला होता. पण, अपयश आले पण हार न मानता घरच्यांच्या प्रोत्साहनाने चौथ्यांदा यश मिळवले. वीरेंद्रचे वडील रेल्वेत लोको पायलट आहेत आणि आई गृहिणी आहे. त्याच्या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.