मराठी बातम्या /बातम्या /करिअर /10वीच्या विद्यार्थ्यांनो, निकाल तर लागला पण कधी होणार CET Exam? वाचा महत्त्वाची माहिती

10वीच्या विद्यार्थ्यांनो, निकाल तर लागला पण कधी होणार CET Exam? वाचा महत्त्वाची माहिती

अकरावीच्या प्रवेशाबाबत (CET exam date 2021) एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

अकरावीच्या प्रवेशाबाबत (CET exam date 2021) एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

अकरावीच्या प्रवेशाबाबत (CET exam date 2021) एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई, 16 जुलै: कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) आज 16 जुलैला जाहीर होण्याची घोषण केली. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत सर्व माहिती देण्यात आली. यात अकरावीच्या प्रवेशाबाबत (CET exam date 2021) एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे. आजच्या शालेय शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत या परीक्षेबद्दल माहिती देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार, ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी नसून ज्यांना अकरावीत प्रवेश घ्यायचा आहे आणि जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात अशांसाठी आहे. ही परीक्षा साधारणतः ऑगस्टच्या शेवटच्या (August last week) आठवड्यात किंवा त्यानंतर घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

हे वाचा - Maharashtra 10th result 2021 Declared: काय आहेत या ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य

ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी लवकरच पोर्टल खुलं केलं जाणार आहे आणि रजिस्ट्रेशनला (CET Registration) सुरुवात होणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता दहावीचा निकाल तर लागला मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर CET परीक्षेचं नवं आवाहन असणार आहे.

अशी होणार CET परीक्षा

ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात  इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Science) आणि  सामाजिक शास्त्र (Social Science)  या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Entrance exam, Maharashtra, Ssc board