नवी दिल्ली, 25 जानेवारी: तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पोस्ट ऑफिसनं बचत खात्यातील कमीत कमी रक्कम 50 रुपयांवरून 500 रुपये केली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खात्यात कमीत कमी 500 रुपये असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुमच्या खात्यात 50 रुपये असेल तर आत्ताच खात्यात 500 रुपये जमा करा नाही तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.
खात्यात 50 ऐवजी 500 रुपये ठेवावे लागणार आहे
पोस्ट ऑफिसनं त्यांच्या बचत खात्याचे निमय बदलले आहे. त्यामुळं तुमच्या खात्यात जर 50 रुपये असेल तर तातडीनं आता त्यात बदल करा. कारण पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात कमीत कमी 500 रुपये बॅलेन्स असणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. जर तुमच्या बचत खात्यात 500 रुपये नसेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून पॅनल्टी लागणार आहे. 19 डिसेंबर 2019 पर्यंत पोस्ट ऑफिसच्या 13 कोटी बचत खात्यात 500 पेक्षा कमी बॅलन्स होतं. त्यामुळं पोस्ट ऑफिसनं नवा नियम जारी केला आहे.
ग्राहकांना बॅलेन्स ठेवण्याच्या सुचना
ग्राहकांच्या खात्यात 500 पेक्षा कमी बॅलेन्स असल्यानं पोस्ट ऑफिसकडून आता सर्व ग्राहकांना सुचना देण्यात येणार आहे. प्रत्येक खातेधारकांना त्यांच्या खात्यात मिनीमम बॅलेन्स ठेवणं गरजेच आहे. तशा सुचना पोस्ट ऑफिसच्या संचालकांनी सर्व पोस्ट ऑफिसला दिल्या आहे. पोस्ट ऑफिसकडून आता सर्व खातेधारकांना बॅलेन्स ठेवण्याच्या सुचना देण्यात येणार आहे. मिनीमम बॅलेन्स नसल्यानं प्रत्येक वर्षी पोस्ट ऑफिसला तब्बल 2 हजार 800 कोटींचं नुकसान होतंय.
बॅलेन्स नसेल तर पॅनल्टी द्यावी लागणार
पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात 500 रुपये बॅलेन्स न ठेवल्यास ग्राहकांना पॅनल्टी द्यावी लागणार आहे. मात्र पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण भागातील लोकांची खाती सर्वाधिक आहे. त्यांच्याकडून 500 रुपये बॅलेन्स बचत खात्यात ठेवणं कठीण आहे. खात्यात पैसेच नाही आणि तरीही पॅनल्टी लागत असेल तर अनेक जणं खात बंद करू शकतात. कारण ग्रामीण भागातील लोकांकडे तेवढा पैसा नसल्याचं एका मीडिया रिपोर्टनं सांगितलं आहे. बचत खात्यात 500 रुपये नसल्यास वर्षाच्या अखेरेस खात्यातून 100 रुपये कापले जाणार आहे. प्रत्येक वर्षी 100 रुपये पॅनल्टीच्या नावाखाली कापले जाणार आहे. बचत खात्यात पैसेच नसेल तर काही वर्षात खात बंद केलं जाणार आहे.
500 रुपयात उघडता येतं खातं
पोस्ट ऑफिसचं नवं बचत खातं केवळ 500 रुपयात उघडता येतं. कुणाही भारतीय नागरिकाला 500 रुपयात बचत खातं उघडता येतं. सिंगल, ज्वाईंट अथवा मुलाच्या नावावर खातं उघडता येतं. खात उघडल्यानंतर एटीएम कार्ड, चेकबुकची सुविधाही मिळते.
व्याजावर द्यावं लागत नाही टॅक्स
पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सुविधा ग्राहकांना दिल्या जातात. अनेक योजनाही पोस्ट ऑफिस चालवतं. विविध स्कीममधून लोकांना व्याजही मिळतं. पोस्ट ऑफिसमधील स्कीममधून मिळणाऱ्या व्याजाच्या पैशांवर कोणताही टॅक्स लागत नाही. केंद्र सरकार दरवषी पोस्ट ऑफिसमधून मिळणारं व्याजदरात फेरबदल करते.
हेही वाचा- SBI ग्राहकांसाठी खूशखबर, आता डेबिट कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही
पुढच्या आठवड्यात सलग 3 दिवस बंद राहणार बँका,आधीच करून घ्या ही कामं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Post office, Post office balance