मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

राज भैय्या, स्वागत है!

राज भैय्या, स्वागत है!

ज्या मुद्यावरुन गुद्द्यावर आले होते  तिथेच राज ठाकरे काही तरी चाचपडत आहे. उत्तरभारतीयांच्या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाणार आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे मनसेसैनिकही चक्रावून गेले आहे.

ज्या मुद्यावरुन गुद्द्यावर आले होते तिथेच राज ठाकरे काही तरी चाचपडत आहे. उत्तरभारतीयांच्या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाणार आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे मनसेसैनिकही चक्रावून गेले आहे.

ज्या मुद्यावरुन गुद्द्यावर आले होते तिथेच राज ठाकरे काही तरी चाचपडत आहे. उत्तरभारतीयांच्या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाणार आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे मनसेसैनिकही चक्रावून गेले आहे.

'प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं' असं म्हटलं जातं हाच नियम निवडणुका आल्या की राजकीय पक्षांना लागू होतो. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढते तर कुठे आयारामांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. काही ठिकाणी तर 'वाल्याचा वाल्मिकी' करण्याचा प्रयत्न म्हणून थेट गुंडांनाच तिकीटं दिलं जातात. आता याच कालचक्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठी माणसाचा 'मुद्दा' हाती घेऊन राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांना 'गुद्दे' देण्यास सुरुवात केली. मराठी माणसाला आपल्या मातृभूमीत रोजगार मिळालाच पाहिजे अशी रोखठोक भूमिका घेऊन मनसेसैनिकांनी रेल्वे भरतीची परीक्षा असो किंवा फेरीवाले भेटेल तिथे उत्तरभारतीयांना 'खळ्ळखटॅक ' देत चोपून काढले. मनसेच्या या अॅक्शनला रिअॅक्शन देत काही उत्तरभारतीय नेत्यांनी लाठ्या काठ्या वाटण्याची भाषा वापरली. याला उत्तर म्हणू खुद्द राज ठाकरे यांनी 'तुम्ही लाठ्या काठ्या वाटणार असाल तर आम्ही तलवारी वाटू' अशी धमकीच दिली होती.

उत्तरभारतीय विरुद्ध मनसे या वादात राज ठाकरे यांनी मराठी मनं जिंकली आणि पहिल्याच निवडणुकीत १३ आमदारही निवडून आले. पण म्हणतात ना की, यश मिळवल्यानंतर ते टिकवून ठेवणे अवघड असते हाच मात्रा राज ठाकरेंना लागू झाला.

राज ठाकरे स्टंटबाजी करत आहेत : संजय निरुपम

मध्यंतरी झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये मनसेची पार धुळधाण उडाली. एकेकाळी १३ आमदारांचा पक्ष आता विना आमदाराचा झाला. उरले ते फक्त नेते आणि राज ठाकरे...

पण एवढ्यात पराभव स्विकारणारे राज ठाकरे मुळीच नाही.  'हा जो पराभव आपण पाहिला हा शेवटचा पराभव आहे' अशी भीमगर्जना करत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला लागले. पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. अनेक आमदार, धडाडीचे नेते एवढंच नाहीतर नगरसेवक सुद्धा सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या दावणीला बांधले गेले.

'जे गेले ते कावळे उरले मावळे' म्हणत राज ठाकरे यांनी पक्षाचे ध्येयधोरण नव्याने ठरवण्यास सुरुवात केली. आता ज्या मुद्यावरुन गुद्द्यावर आले होते  तिथेच राज ठाकरे काही तरी चाचपडत आहे. उत्तरभारतीयांच्या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाणार आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे मनसेसैनिकही चक्रावून गेले आहे. ज्यांना आपण खळ्ळखटॅक देण्यात मागे पुढे पाहिलं नाही त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून आपले पक्ष अध्यक्ष राज ठाकरे बसणार हे मनसेसैनिकांना न पचणारे आहे. माध्यमांशी बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणतात, " मराठी माणसाबद्दल आमची भूमिका ठाम आहे. परंतु, मुंबईत ज्या उत्तरभारतीयांच्या कित्येक पिढ्या आहे त्यांच्यासमोर विचार मांडण्यात काही हरकत नाही. "

परंतु, राजकारणात असं घडणे ही काही नवी गोष्ट नाही.  याआधीही अनेक पक्षांनी आपली नीतिमत्ता खुटीला टांगून धोरणं बदलेली आहे. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आपण घेतलेल्या भूमिकेला मुठमाती दिली होती. 'घरात खायला नाही पिठ आणि यांना हवे विद्यापीठ' असं वक्तव्य करून बाळासाहेबांनी औरंगाबाद ( सेनेच्या भाषेत संभाजीनगर) विद्यापीठाच्या नामांतरला विरोध दर्शवला होता. त्यानंतर दलित समाजाने केलेला विरोध आणि घडलेल्या दंगली या इतिहासाच्या पानात अजूनही तशाच आहे. त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं शिवशक्ती-भिमशक्तीचा नारा देऊन सत्तेचं फळ चाखलं. पण युतीच्या नेत्यांच्या मानपानामुळे युती तुटली आणि रामदास आठवले भीमशक्ती घेऊन भाजपच्या गोटात जाऊन बसले.

सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघही यात मागे नाही. हिंदुत्वादाचा मुद्दा मिरवणाऱ्या भाजपने ईदच्या काळात ईदमिलन कार्यक्रम घेऊन अल्पसंख्याकांची मनं जिंकण्याची काम केले.  संघानेही आपल्या नागपुरच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ज्या काँग्रेस पक्षाचा आणि गांधी घराण्याचा विरोध केला त्याच पक्षाचे सरसेनापती असलेले पण देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मोहन भगावतांनी आपल्या बाजूला बसवले होते.

राजकारणात असे अनेक प्रकार घडले आहे ज्यात सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनीच आपली नीतिमत्ता सोडून काही निर्णय घ्यावे लागले. पण हे निर्णय घेत असताना पक्षाला आणि त्यांच्याध्येयधोरणाला तिलांजली दिली याची किंमतही चुकवावी लागली आहे.

मनसेची अवस्था आता अगदी नव्याने सुरू झाली आहे. राज ठाकरे यांची व्यंगचित्र गाजत असली तरी ती एक कलाकार म्हणून उत्तम आणि दर्जेदार अशीच आहे. परंतु, याचा फायदा पक्षाला होतोय का ? हे येणारा काळच सांगू शकेल.

राज ठाकरे यांचं भाऊबीज कार्टून : मोदींवर रुसलेली ही बहीण कोण?

पक्षाची मोट बांधण्यासाठी राज ठाकरे यांनी साम-दाम-दंड पैकी साम म्हणजे सामोचार तत्वाचा मार्ग अंवलबलाय कारण दंड ते आधीच वापरुन झालंय म्हणून राज ठाकरे कोणतीही भूमिका मांडत असताना स्वत:ची न म्हणता पक्षाला किती फायदेशीर ठरेल याचा विचार नक्की करत असावे.  दंडाची भाषा न वापरता आता सामोचाराने पुढे जात राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांच्या बाजूला बसण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चमत्कारिक असला तरी राजकीय क्षेत्रात 'राजभैय्या, आपका स्वागत है' असं म्हटलं तर वावगं ठरणारा नाही हेही मात्र तितकचं खरं आहे.

(लेखातले विचार हे लेखकाचं व्यक्तिगत मत आहे. त्या विचारांशी 'न्यूज18 लोकमत' सहमत असेलच असं नाही.)

First published:

Tags: MNS, Raj Thackeray, मनसे, राज ठाकरे