मुंबई 14 ऑगस्ट: दैनंदिन जीवनातल्या बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे स्मार्टफोन (Smartphone) ही काळाची गरज बनली आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. युझर्सची मागणी आणि गरजेनुसार बाजारात अगदी वाजवी किमतीपासून महागातले महाग स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. अधिकाधिक फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्सना युझर्सकडून विशेष पसंती मिळताना दिसते. आज बाजारात अनेक कंपन्यांचे वैविध्यपूर्ण स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. शाओमी (Xiaomi) ही त्यापैकीच एक कंपनी. शाओमीला लवकरच 10 वर्षं पूर्ण होत आहेत. अत्यंत कमी कालावधीत शाओमीने भारतीय बाजारात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या पार्श्वभूमीवर, 10 वर्षांपूर्वी सादर केलेला Xiaomi M1 हा स्मार्टफोन ज्यांनी त्या वेळी प्री-बुकिंग (Pre-Booking) करून खरेदी केला होता, त्या ग्राहकांना पैसे परत दिले जातील, अशी घोषणा शाओमीने एका इव्हेंटमध्ये (Event) नुकतीच केली आहे. शाओमीच्या या मनीबॅक ऑफरबाबतचं वृत्त 'झी न्यूज'ने दिलं आहे.
शाओमीने नुकताच चीनमध्ये Mi Mix 4 हा फोन सादर केला आहे. हा अंडरस्क्रीन कॅमेरा (Under Screen Camera) असलेला शाओमीचा पहिला फोन आहे. कंपनीने नुकतंच Mi Pad 5 चंही अनावरण केलं आहे. त्यात ड्युएल कॅमेरा सेटअप, दमदार बॅटरी आणि 11 इंच मोठा एलसीडी डिस्प्ले (LCD Display) आहे. या वेळी शाओमीने Mi 1 च्या प्री-बुकिंगवर ग्राहकांना पैसे परत देण्याची म्हणजेच मनीबॅक ऑफरची घोषणा केली आहे. चीनमधल्या (China) या अग्रगण्य कंपनीच्या मूळ Mi 1 च्या सादरीकरणाला नुकतीच 10 वर्षं पूर्ण झाली आहेत.
आता उलगडणार अमृताची पर्सनल सिक्रेट्स; चाहत्यांसाठी अभिनेत्रीची खास भेट
गेल्या काही वर्षांत शाओमीने चीनबाहेरील बाजारपेठांमध्ये आपला विस्तार केला आहे. ही भारतातली पहिल्या क्रमांकाची मोबाइल कंपनी ठरली आहे. जून 2021मध्ये सॅमसंग (Samsung) आणि अॅपलला (Apple) मागे टाकत शाओमी ही जगातली पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली होती.
शाओमीने 2011 मध्ये Mi 1 हा स्मार्टफोन सादर केला होता. त्या वेळी कंपनीने या सीरिजअंतर्गत फ्लॅगशिप ऑफर (Flagship Offer) देऊन अनेक फोन सादर केले होते. Mi11 हे शाओमीचं नवं उत्पादन असून, यात टॉप ऑफ द लाइन Mi 11 चाही समावेश आहे.
Boycott ट्रेंड झाल्यानंतर राधिका आपटे पुन्हा झाली बोल्ड; म्हणाली, 'प्रभावित नाही पण...'
10 वर्षांपूर्वी सादर केलेल्या Mi 1 या स्मार्टफोनमध्ये 4 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला होता. एलसीडीवर आणि खालच्या बाजूला जाड बेझल्स होते. त्यात नेव्हिगेशन आणि मल्टिटास्किंगसाठी कॅपॅसिटिव्ह टच देण्यात आला होता. फोनच्या मागील बाजूला 8 MP कॅमेरा सेन्सर होता. या फोनला क्वालकॉम MSM8260 ड्युएल कोअर Soc हा प्रोसेसर होता. त्यात 1 जीबी रॅम आणि छोटी 1930 mAh ची बॅटरी होती. यात दोन मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला होता. प्रॉडक्ट्स विकिपीडिया पेजने दिलेल्या माहितीनुसार, या फोनच्या पहिल्या 34 तासांत 3,00,000 पेक्षा जास्त आगाऊ ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या होत्या.
शाओमीने केलेल्या घोषणेनुसार, कंपनीला 10 वर्षं होत असल्याच्या निमित्ताने, Mi M1 हा फोन तेव्हा प्री-बुकिंग करून खरेदी केलेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत. एमआय मिक्स 4 च्या सादरीकरण कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे. मनी बॅक ऑफरसाठी युझर्सकडे त्या वेळचे Mi ID क्रेडेन्शियल असणं आवश्यक आहे, ज्यांचा उपयोग शाओमीच्या Mi.com या ऑनलाइन स्टोअरवर Mi 1 खरेदीसाठी करण्यात आला होता. यामुळे योजनेसाठी शाओमीला सुमारे 57 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढी रक्कम ग्राहकांना परत द्यावी लागेल, असा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Xiaomi