मुंबई, 27 नोव्हेंबर: बहुतेक लोक घरापासून ऑफिसला जाण्यासाठी बाइकचा वापर करतात. बाईकबाबत तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. खरंतर शहरांमध्ये प्रचंड रहदारी असते, त्यामुळं कारपेक्षा बाईकच्या माध्यमातून तुम्ही कुठेही पटकन पोहोचू शकता. अलीकडच्या काळात बाईक आकर्षक बनवण्यासाठी आणि इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी ती मॉडिफाय करतात. काही लोक तर बाईकचा लूक पूर्णपणे बदलून टाकतात. आपल्याला बाईकमध्ये एक किंवा दोन सायलेन्सर दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का सुपर बाइक्समध्ये एकाच ठिकाणी दोन सायलेन्सर का असतात, त्यामागचं कारण काय आहे? चला जाणून घेऊया, यामागचं कारण… सायलेन्सरचे काम काय आहे? महागड्या बाइक्सना एका ऐवजी दोन सायलेन्सर असतात. सामान्यतः त्याचं काम इंजिनमधून बाहेर पडणारा धूर फिल्टर करणं आहे. इतकंच नाही तर त्याचं दुसरं काम म्हणजे इंजिनमधून येणारा आवाज कमी करणं. पण काही लोक बाईकचा आवाज वाढवण्यासाठी बाईकचे सायलेन्सर बदलतात. असे सायलेन्सर गाडीला लावल्यामुळं आपल्याला खूप नुकसान देखील होऊ शकतं. ध्वनी प्रदूषणामुळं वाहतूक पोलिस चालान करतात. हेही वाचा: ‘या’ e-bikeनं लोकांना लावलंय वेड, अवघ्या 2 तासाच सोल्ड आउट सुपरबाईकला दोन सायलेन्सर असण्याचं कारण- आता फक्त एका सायलेन्सरने इंजिनचा आवाज आणि त्यातून निघणारा धूर फिल्टर करणं शक्य नाही का, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. वास्तविक, अधिक सीसीची बाईक असल्यानं एका एक्झॉस्टने हे करणं शक्य नाही. त्यामुळं कंपन्या महागड्या आणि अवजड बाइकमध्ये दोन सायलेन्सर बसवतात. याशिवाय दोन सायलेन्सरमुळं बाईकचा शोसुद्धा वाढतो. लोकांनाही आपली बाईक हटके असावी असं वाटतं. त्यामुळं बाईक लव्हर्स बाइक खरेदी करताना एक्झॉस्टमधून येणारा आवाज नक्कीच तपासतात.
सायलेन्सर स्वतंत्रपणे लावल्यास मोठं नुकसान होऊ शकतं- आपल्या देशात कोणत्याही बाईक किंवा कारला वेगळा लूक देण्यासाठी त्यात बदल करणं बेकायदेशीर आहे. असं केल्यानं हजारो रुपयांचं चलन होऊ शकतं. एवढंच नाही तर वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांना थांबवण्यापूर्वी सायलेन्सरकडेही लक्ष देतात. त्यामुळे पर्यावरणाला हानी तर होतेच, पण त्यामुळे ध्वनी प्रदूषणही होते. त्यांना पाहून रस्त्यावर वाहन चालवणारे इतर लोक विचलित होतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.