जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / रस्ते, जल की विमान वाहतूक? 'ही' वाहनं करतात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन

रस्ते, जल की विमान वाहतूक? 'ही' वाहनं करतात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन

रस्ते, जल की विमान वाहतूक? 'ही' वाहनं करतात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन

का अहवालानुसार, देशातल्या एकूण कार्बन डायऑक्साइडमध्ये प्रवासी वाहनांचा (Public Transport) वाटा मोठा आहे. सुमारे 45.1 टक्के कार्बन-डायऑक्साइड प्रवासी वाहनांमधून बाहेर पडतो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 11 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषणाची (Air Pollution) पातळी सातत्यानं वाढत आहे. याचा मोठा परिणाम पर्यावरणावर (Environment) दिसून येत आहे. वायू प्रदूषण वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. वाहनांचा (Vehicle) वाढता वापर हेदेखील वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमुळे कार्बन उत्सर्जनाची (Carbon Emission) पातळी सातत्यानं वाढत आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत आहे. वाहनांमधून कार्बन-डाय-ऑक्साइडचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं हवा प्रदूषित होत आहे. याचे दुष्परिणाम सातत्यानं दिसून येत आहेत. परंतु, केवळ रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांमुळेच प्रदूषण वाढतं असं नाही, तर विमान आणि जहाजांमुळेदेखील वायूप्रदूषण वाढण्यास हातभार लागतो. नेमकं कोणतं वाहन किती कार्बन उत्सर्जन करतं, याविषयीची माहिती ` टीव्ही नाइन हिंदी `ने दिली आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आणि इंटरनॅशनल कौन्सिल ऑन क्लीन ट्रान्सपोर्टेशनच्या माहितीच्या आधारे इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, वाहनांमधून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन होतं. यात कोणत्या वाहनाचा किती वाटा आहे, हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे. ‘बीफ खाण्यास चुकीचं मानत नव्हते सावरकर, गायीला माता मानण्याच्याही होते विरोधात’, काँग्रेस नेत्याचं मोठं विधान एकूण कार्बन उत्सर्जनात रेल्वेचा (Railway) वाटा तुलनेनं कमी आहे. वातावरणाच्या एकूण प्रदूषणात फक्त 1 टक्का प्रदूषण रेल्वेमुळे होतं. याशिवाय गॅस, पाणी, वायू वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य वाहनांमुळे 2.2 टक्के प्रदूषण होतं. सागरी दळणवळणासाठी (Maritime Transport) वापरल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वातावरणातला कार्बनचा स्तर वाढत असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. वातावरणातल्या कार्बन उत्सर्जनात सागरी वाहनांचा वाटा 10.6 टक्के आहे. सर्वाधिक कार्बन उत्सर्जन रस्त्यावरच्या वाहनांमधून होतं. विशेष म्हणजे यात सर्वाधिक वाटा ट्रकचा नसून, प्रवासी वाहनांचा आहे. एका अहवालानुसार, देशातल्या एकूण कार्बन डायऑक्साइडमध्ये प्रवासी वाहनांचा (Public Transport) वाटा मोठा आहे. सुमारे 45.1 टक्के कार्बन-डायऑक्साइड प्रवासी वाहनांमधून बाहेर पडतो. या प्रवासी वाहनांमध्ये कार, मोटारसायकल, बस आणि टॅक्सीचा समावेश आहे. सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन गदारोळ,ISIS-बोको हरामशी केली हिंदुत्वाची तुलना प्रवासी वाहनांनंतर सर्वाधिक कार्बन उत्सर्जनात नंबर लागतो तो मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा. ट्रक हे त्याचं सहज दिसून येणारं उदाहरण म्हणता येईल. सुमारे 29.4 टक्के कार्बन उत्सर्जन हे मालवाहू वाहनांमधून होत असल्याचं दिसून आलं आहे. केवळ रस्त्यावर धावणारी वाहनंच कार्बन उत्सर्जन करतात, असं नाही. विमानांमधूनही (Airplane) कार्बन उत्सर्जन होतं. सुमारे 11.6 टक्के प्रदूषण विमानांमुळे होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यात प्रवासी विमानांमधून 81 टक्के, तर मालवाहू विमानांमधून 19 टक्के कार्बन-डायऑक्साइड बाहेर पडतो. त्यामुळे ज्या विमानानं आपण आरामदायी प्रवास करतो, ते विमान प्रत्यक्षात पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरतं, असं समजायला काहीच हरकत नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात