मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /कडाक्याच्या थंडीनं त्रस्त आहात? अवघ्या 15 मिनिटांत तयार करू शकता रूम हीटर

कडाक्याच्या थंडीनं त्रस्त आहात? अवघ्या 15 मिनिटांत तयार करू शकता रूम हीटर

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

तुम्हाला रूम हीटरसाठी पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही घरातील टाकाऊ वस्तूंपासून सहज रूम हीटर बनवू शकता. हा घरगुती रूम हीटर तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटे लागतील.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 11 जानेवारी : सध्या संपूर्ण देशभरात थंडीची लाट पसरली आहे. हिवाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी हवेमध्ये म्हणावा तसा गारवा नव्हता. मात्र, आता हवेतील गारवा प्रचंड वाढला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील परिस्थिती जास्तच बिकट आहे. तिथे थंडीसह दाट धुक्याचादेखील सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये घरात रूम हीटरची आवश्यकता भासत आहे. मात्र, सिझनमुळे हीटर खूप महाग झाले आहेत. जर तुम्हाला रूम हीटरसाठी पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही घरातील टाकाऊ वस्तूंपासून सहज रूम हीटर बनवू शकता. हा घरगुती रूम हीटर तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटे लागतील. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रूम हीटर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य:

रूम हीटर तयार करण्यासाठी टिनचा डबा, माप घेण्यासाठी स्केल डिव्हायडर आणि पेन, स्टीलचा पाईप, कटर, एमसील, 38 सेंटिमीटर अॅल्युमिनियम वायर, लायटर, 10 सेंटिमीटर कार्डबोर्ड (दुहेरी), सिल्व्हर कोटिंग स्प्रे, रूम हीटर रॉड, साधा टेप, इलेक्ट्रिक वायर, डबल टेप.

रूम हीटर तयार करण्याची कृती:

- टीनच्या डब्याच्या कोपऱ्यात नऊ सेमी अंतरावर एक खूण करा.

- दोन्ही बाजूंनी वरून खालपर्यंत एक रेघ मारा.

- कटरच्या सहाय्यानं डबा कापा. यामुळे हीटरचा आकार मिळेल.

- त्यानंतर स्टीलच्या पाईपचे चार सेंटिमीटर लांबीचे दोन तुकडे करा.

- हे दोन्ही तुकडे कापलेल्या टीन डब्याच्या मध्यभागी एमसीलच्या मदतीनं बसवा.

- शिल्लक राहिलेल्या टीनच्या तुकड्यावर कोपऱ्यातून 180 अंशांत म्हणजे अर्धगोलाकार कापून घ्या. या आकाराचे दोन तुकडे करा.

- नंतर अॅल्युमिनियमची तार घ्या आणि तिचं आवरण काढा. कव्हर काढण्यासाठी ती गरम करावी लागेल. लक्षात ठेवा ही वायर 38 सेंटिमीटर असली पाहिजे.

- कापलेल्या टीनच्या तुकड्यांवर एमसील लावा आणि त्यात अॅल्युमिनियमची वायर चिकटवा. अर्ध गोलाकार आकारात किमान पाच ते सहा वायर जोडा.

- स्टँड तयार करण्यासाठी कार्डबोर्डची गरज लागेल. कार्डबोर्ड कापल्यानंतर मागील बाजूस डबल टेप चिकटवावा लागेल.

- त्यानंतर तो कार्डबोर्ड टिनमध्ये चिकटवा. आता टिनच्या आत आणि बाहेर व पुठ्ठ्यावर सिल्व्हर कोटिंग स्प्रे फवारा.

- रूम हीटरचा रॉड घ्या आणि त्याला वायरला जोडा. टिनच्या मधोमध लावलेल्या पाईपवर वायर टाकून हीटिंग रॉड बसवा.

- उर्वरित वायर टेपनं चिकटवा. आता अ‍ॅल्युमिनियमच्या वायरनं बनवलेला बाहेरचा भाग टेपच्या साहाय्यानं चिकटवा. उरलेली तार टिनच्या मागे टेपच्या साहाय्याने चिकटवा.

हे वाचा - सर्वच गाठी कर्करोगाच्या नसतात, पाहा कॅन्सरची गाठ कशी ओळखावी?

- आता वायर प्लगला जोडा आणि नंतर विजेशी जोडा. अशाप्रकारे तुमचा रूम हीटर तयार होईल.

ही कृती व्हिडिओद्वारे समजून घ्यायची असेल तर युट्यूबवर अनेक कंटेंट क्रिएटर्सनी याबाबत व्हिडिओ तयार केले आहेत. ते पाहून तुम्ही सहजपणे रूम हीटर तयार करू शकता.

First published:
top videos

    Tags: Winter, Winter session