• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : मुजीब-राशिदचा कहर, अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर सगळ्यात मोठा विजय

T20 World Cup : मुजीब-राशिदचा कहर, अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर सगळ्यात मोठा विजय

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने धमाक्यात सुरुवात केली आहे. मुजीब उर रहमानच्या (Mujeeb Ur Rahman) वादळी स्पेलमुळे अफगाणिस्तानने स्कॉटलंडवर (Afghanistan vs Scotland) तब्बल 130 रनने विजय मिळवला आहे.

 • Share this:
  शारजाह, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने धमाक्यात सुरुवात केली आहे. मुजीब उर रहमानच्या (Mujeeb Ur Rahman) वादळी स्पेलमुळे अफगाणिस्तानने स्कॉटलंडवर (Afghanistan vs Scotland) तब्बल 130 रनने विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने दिलेल्या 191 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा 10.2 ओव्हरमध्ये फक्त 60 रनवर ऑल आऊट झाला. मुजीब उर रहमानने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 5 विकेट घेतल्या, तर राशिद खानने (Rashid Khan) 2.2 ओव्हरमध्ये 9 रन देऊन 4 विकेट मिळवल्या. नवीन उल हकला एक विकेट घेण्यात यश आलं. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुनसीने सर्वाधिक 25 रन केले. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 190 रन केले. नजीबुल्लाहने 34 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली. तर गुरबाझने 46, हजरतुल्लाह झझईने 44 रन केले. स्कॉटलंडच्या साफियान शरीफने 2 विकेट घेतल्या. डेव्ही आणि मार्क वॅटला 1-1 विकेट मिळाली. रेकॉर्ड्सची बरसात अफगाणिस्तानने या विजयासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मुजीब उर रहमानने केलेली अफगाणिस्तानची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी 2016 वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद नबीने हॉंगकाँगविरुद्ध 20 रन देऊन 4 विकेट घेतल्या होत्या. अफगाणिस्तानचा टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमधला हा सगळ्यात मोठा विजय आहे. स्कॉटलंडचे 9 खेळाडू या सामन्यात एलबीडब्ल्यू आऊट झाले. एका टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एवढे एलबीडब्ल्यू व्हायचा हा विक्रम आहे.
  Published by:Shreyas
  First published: