मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

smartphone blast reasons : निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो, 'या' चुकांमुळे स्मार्टफोन बॅटरीचा होतो स्फोट

smartphone blast reasons : निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो, 'या' चुकांमुळे स्मार्टफोन बॅटरीचा होतो स्फोट

`या` चुकांमुळे होऊ शकतो स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट

`या` चुकांमुळे होऊ शकतो स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट

सध्याच्या काळात स्मार्टफोन ही गरजेची वस्तू बनली आहे. आता बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे साहजिकच स्मार्टफोनचा वापरही वाढला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 नोव्हेंबर : सध्याच्या काळात स्मार्टफोन ही गरजेची वस्तू बनली आहे. आता बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे साहजिकच स्मार्टफोनचा वापरही वाढला आहे. अति वापरामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे स्मार्टफोन बिघडणं ही सामान्य बाब आहे; पण स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला किंवा स्मार्टफोनने पेट घेतला अशा स्वरूपाच्या बातम्या बऱ्याचदा आपल्या वाचनात येतात. स्मार्टफोनचा स्फोट होणं ही गंभीर घटना आहे; मात्र त्यामागे काही गोष्टी कारणीभूत असतात.

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्यावर बऱ्याचदा मोबाइल कंपनीला दोष दिला जातो; मात्र बऱ्याचदा चूक युझरची असते. स्मार्टफोन खराब झाला नसेल तर अशा स्थितीत युझरच्या निष्काळजीपणामुळे फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन तो पेट घेऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी युझर्सनी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. तसंच स्मार्टफोनचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. अशा घटना घडू नयेत यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, त्याबाबत जाणून घेऊ या. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

हे ही वाचा : फीचर असावं तर असं! Google Mapsमध्ये आलंय तुमच्या गाडीशी संबंधित जबरदस्त फीचर, ‘हा’ होणार फायदा

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन तो जळू नये, यासाठी युझरने निष्काळजीपणा टाळला पाहिजे. काही युझर्स स्मार्टफोनमधली बॅटरी काढून ती मॅजिक चार्जरने चार्ज करतात. अनेक दुर्घटनांमध्ये ही बाब दिसून आली आहे. मॅजिक चार्जरचा वापर करणं खूप धोकादायक आहे. यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. बहुतांश फोनमध्ये नॉन-रिमूव्हेबल बॅटरी असते. त्यामुळे अशा स्मार्टफोनमध्ये हा धोका नसतो.

स्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी ओरिजनल चार्जरचा वापर करावा. अनेकदा युझर्स याकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम स्मार्टफोनच्या बॅटरीवर होतो. चुकीचा चार्जर वापरल्याने स्मार्टफोनची बॅटरी प्रमाणापेक्षा जास्त गरम होते. त्यामुळे जास्त वेळ या चार्जरचा वापर केला तर बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

स्मार्टफोन चार्ज करताना त्यावर गेम्स खेळत असाल तर असं करणं तातडीने थांबवावं. स्मार्टफोनचं चार्जिंग सुरू असताना त्याचा वापर करणं एखाद्या दुर्घटनेला आमंत्रण देणारं ठरू शकतं. चार्जिंग करताना फोन गरम होतो. अशा वेळी त्याचा वापर केल्यास तो प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन एखादी दुर्घटना घडू शकते.

हे ही वाचा : फक्त 275 रुपयांमध्ये 3300 GB डेटा अन् अमर्यादित कॉल्स, पाहा ऑफरची शेवटची तारीख

प्रत्येक वस्तूची ठरावीक क्षमता असते. स्मार्टफोनलादेखील ही बाब लागू आहे. स्मार्टफोनवर जास्त ताण दिला तर तो गरम होऊ लागतो. जास्त गरम झाल्याने फोनचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे फोनमधली मेमरी 75 ते 80 टक्क्यांपर्यंतच वापरावी. उर्वरित जागा रिकामी ठेवावी. तसंच अनेक अ‍ॅप्स एका वेळी ओपन करणं टाळावं. या गोष्टींचं पालन केल्यास स्मार्टफोनच्या बॅटरीच्या स्फोटासारख्या घटना नक्कीच टाळता येतील.

First published:

Tags: Phone battery, Smart phone, Smartphones