जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फक्त 275 रुपयांमध्ये 3300 GB डेटा अन् अमर्यादित कॉल्स, पाहा ऑफरची शेवटची तारीख

फक्त 275 रुपयांमध्ये 3300 GB डेटा अन् अमर्यादित कॉल्स, पाहा ऑफरची शेवटची तारीख

फक्त 275 रुपयांमध्ये 3300 GB डेटा अन् अमर्यादित कॉल्स, पाहा ऑफरची शेवटची तारीख

फक्त 275 रुपयांमध्ये 3300 GB डेटा अन् अमर्यादित कॉल्स, पाहा ऑफरची शेवटची तारीख

स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑफर अंतर्गत, BSNL ने आपल्या जुन्या प्लॅनच्या किमती कमी केल्या होत्या. या तीन योजनांची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर होती, ती 14 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर: सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या ब्रॉडबँड प्लॅन्स अंतर्गत केवळ 275 रुपयांमध्ये 3300 GB पर्यंत डेटा ऑफर करत आहे. याशिवाय 775 मध्ये 2000 GB पर्यंत डेटा दिला जात आहे. इंटरनेट स्पीड जास्त असल्यामुळं 775 रुपयांचा डेटा कमी झाला आहे. आज आम्ही तुम्हाला या प्लॅन्सबद्दल अधिक डिटेल्स सांगणार आहोत. याशिवाय तुम्हाला तिन्ही योजनांची संपूर्ण माहिती देखील देणार आहोत. वास्तविक, बीएसएनएलने स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑफर अंतर्गत आपल्या जुन्या प्लॅनच्या किमती कमी केल्या होत्या. या तीन योजनांची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर होती, ती 14 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये 275 रुपयांचे 2 आणि 775 रुपयांच्या एका प्लॅनचा समावेश आहे. चला या तीन योजनांबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 275 रुपयांचा प्लॅन- BSNL ने 275 रुपयांचे 2 ब्रॉडबँड प्लॅन सादर केले होते. यापूर्वी हे प्लॅन 449 रुपयांचे होते. यामध्ये 3300GB डेटा मिळेल, ज्याचा स्पीड 30Mbps असेल. याशिवाय वैधता पूर्ण होईपर्यंत, अमर्यादित विनामूल्य कॉलची सुविधा देखील उपलब्ध असेल. या प्लॅनची ​​वैधता 75 दिवसांची आहे. दुसरी योजना इतर सर्व बाबतीत समान आहे परंतु वेग 60 Mbps आहे. त्याच वेळी, 3300 GB डेटा संपल्यानंतर, दोन्ही प्लॅनमध्ये स्पीड 4 Mbps पर्यंत खाली येईल. हेही वाचा:  Flipkartवर स्वस्तात खरेदी करू शकता ‘हा’ तगडा स्मार्टफोन; प्रोसेसर, डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी सगळंच झक्कास बीएसएनएलच्या एंट्री प्लनपेक्षाही स्वस्त प्लॅन- बीएसएनएल टेलिकॉम कंपनीनं हे प्लॅन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लाँच केले असून बीएसएनएलच्या एंट्री लेव्हल फायबर ब्रॉडबँड प्लॅनपेक्षा ते स्वस्त आहेत. कंपनीचा नियमित एंट्री लेव्हल प्लॅन 329 रुपये प्रति महिना आहे, ज्यामध्ये 1000 GB डेटा उपलब्ध आहे. 1000 GB डेटा संपल्यानंतर, स्पीड 4 Mbps पर्यंत खाली येतो. तर त्यापूर्वी स्पीड 20 Mbps असेल. हे 275 रुपयांच्या प्लॅनपेक्षा खूपच कमी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

प्लॅन कसा खरेदी करावा? जर तुम्हाला हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही बीएसएनएलच्या वेबसाइटवर जाऊन तीनपैकी तुमचा आवडता प्लान खरेदी करू शकता. याशिवाय, हे प्लॅन जवळच्या बीएसएनएल कार्यालयातून देखील खरेदी केले जाऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, हे प्रमोशनल प्लॅन आहेत, त्यामुळे तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत त्या खरेदी केले तरच तुम्हाला त्यांचे फायदे मिळू शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BSNL , Recharge
  • First Published :
जाहिरात
जाहिरात