जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / CNG Kit for Scooter: तुमची स्कूटर देईल 130 किमीचं मायलेज, फक्त करा हे काम

CNG Kit for Scooter: तुमची स्कूटर देईल 130 किमीचं मायलेज, फक्त करा हे काम

 तुमची स्कूटर देईल 130 किमीचं मायलेज, फक्त करा हे काम

तुमची स्कूटर देईल 130 किमीचं मायलेज, फक्त करा हे काम

Activa, Jupiter, Maestro सारख्या सर्व स्कूटरचे मायलेज सुमारे 40 ते 50Km/l च्या आसपास असतं. अनेक कंपन्या या लोकप्रिय मॉडेल्सला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याची तयारी करत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 सप्टेंबर: देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपये किंवा त्याच्या आसपास आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरात कार चालवणं महाग झालं आहे, दुचाकी वाहनांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे स्कूटर असेल तर अडचणी आणखी वाढतात, कारण Activa, Jupiter, Maestro सारख्या सर्व स्कूटरचे मायलेज सुमारे 40 ते 50Km/l  असतं. आता अनेक कंपन्या या लोकप्रिय मॉडेल्सला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याची तयारी करत आहेत. परंतु तुमची सध्याची स्कूटर केवळ 70 पैसे प्रति किलोमीटर चालू लागली तर? असं तुम्हाला सांगण्यात आलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. आज आम्ही तुम्हाला स्कूटरचं मायलेज कसं वाढवायचं ते सांगणार आहोत. स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवावं लागेल- तुमच्याकडे Honda Activa, TVS Jupiter, Hero Maestro, Suzuki Access किंवा इतर कोणतीही स्कूटर असेल आणि तुम्हाला त्यांचं मायलेज वाढवायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवावं लागेल. दिल्लीस्थित CNG किट बनवणारी कंपनी LOVATO या स्कूटरमध्ये हे किट बसवू शकते. तिची किंमत सुमारे 18 हजार रुपये आहे. कंपनीनं दावा केला आहे की, तुम्ही हा खर्च 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत वसूल करू शकाल, कारण सीएनजी आणि पेट्रोलच्या किंमतीतील तफावत 40 रुपयांपर्यंत आहे. हेही वाचा:  Motorola Edge 30 Ultra: तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन पाहिलाय का? पाहा खास Photos पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालते स्कूटर - स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवायला 4 तास लागतात, पण ती पेट्रोलवरही चालवता येते. यासाठी कंपनी एक स्विच ठेवते, जो CNG मोडवरून पेट्रोल मोडवर स्विच करतो. कंपनी दोन सिलिंडर समोर ठेवते जे काळ्या प्लास्टिकनं झाकलेले असतात. त्याच वेळी, ते चालवणारे मशीन सीटच्या खालच्या भागात बसवले जाते. म्हणजेच अ‍ॅक्टिव्हा सीएनजी आणि पेट्रोल या दोन्हीवर चालवता येते. अ‍ॅक्टिव्हावर सीएनजीशी संबंधित काही ग्राफिक्सही बसवलेले असतात. सीएनजी किट बसवण्याचे तोटे- सीएनजी किट बसवण्याचे काही तोटेही आहेत. प्रथम, या किटमध्ये बसवलेल्या सिलेंडरमध्ये फक्त 1.2 किलो सीएनजी साठवला जातो. अशा परिस्थितीत जेव्हा 120 ते 130 किलोमीटर नंतर तुम्हाला पुन्हा सीएनजीची गरज भासेल. त्याच वेळी, सीएनजी स्टेशन सहज उपलब्ध नाहीत. ते तुमच्या स्थानापासून 10-15 किंवा अधिक किलोमीटर दूर असू शकते. सीएनजीमुळे स्कूटरचे मायलेज वाढू शकते, परंतु ते वाहनाला पिकअप देत नाही. अशा स्थितीत चढावर जाताना गाडीच्या इंजिनवर त्याचा भार पडेल. आता स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवण्यासाठी अनेक कंपन्या बाजारात आल्या आहेत. हे सीएनजी किटवर वॉरंटी देखील देतात. त्याची किंमत तुमच्या शहरानुसार बदलू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात