Motorola Edge 30 Ultra लॉन्च झाला आहे. मोटोरोलाचा हा फोन 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन आहे. कंपनीनं या फोनची सुरुवातीची किंमत 54,999 रुपये ठेवली आहे, परंतु ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. या फोनची विक्री 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. या फोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट तसेच 125W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे.
Motorola Edge 30 Ultra मध्ये 6.67-इंचाचा 10-बिट OLED FHD+ एंडलेस एज डिस्प्ले आहे, जो HDR10+, 144Hz4 फास्ट रिफ्रेश रेटसह येतो. संरक्षणासाठी त्याच्या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 5 चं संरक्षण मिळतं. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 1250 निट्स आहे. यात स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. तसेच 8 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 128 GB स्टोरेज आहे.