मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Car घ्यायची आहे पण बजेट कमी आहे? 3 लाखात येतील या 4 हॅचबॅक, पाहा काय आहे ऑफर

Car घ्यायची आहे पण बजेट कमी आहे? 3 लाखात येतील या 4 हॅचबॅक, पाहा काय आहे ऑफर

हॅचबॅक कार साधारण 4 ते 5 लाख रुपयांना मिळते, मात्र बाजारात अशादेखील काही गाड्या आहेत ज्या 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात.

हॅचबॅक कार साधारण 4 ते 5 लाख रुपयांना मिळते, मात्र बाजारात अशादेखील काही गाड्या आहेत ज्या 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात.

हॅचबॅक कार साधारण 4 ते 5 लाख रुपयांना मिळते, मात्र बाजारात अशादेखील काही गाड्या आहेत ज्या 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात.

  नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : कोरोनानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक नागरिक प्रवासासाठी वैयक्तिक वाहनाचा (Personal vehicle) वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. अनेक कार निर्मिती कंपन्यांनी आपल्या नवनवीन गाड्या बाजारामध्ये आणल्या आहेत. सध्या भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये (Automobile market) अनेक कार्स उपलब्ध आहेत. त्यापैकी हॅचबॅक (Hatchback) आणि मायक्रो एसयूव्ही (Micro SUV) कार्सना लोकांची अधिक पसंती मिळत आहे. गाडीचा लूक आणि फीचर्स पाहता हॅचबॅक कार साधारण 4 ते 5 लाख रुपयांना मिळते, मात्र बाजारात अशादेखील काही गाड्या आहेत ज्या 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात. अर्थातच त्या सेकंड हँड कार्स आहेत. या गाड्या सेकंड हँड कार्सची विक्री करणारी वेबसाइट Cars 24 वर लिस्टेड आहेत.

  Hyundai i20 -

  सेकंड हँड सेगमेंटमध्ये 2.58 लाख रुपयांना ह्युंदाईची ही गाडी उपलब्ध आहे. या पांढऱ्या रंगाच्या गाडीचं उत्पादन 2011 मध्ये झालेलं आहे. दिल्लीच्या DL-7C आरटीओमध्ये ही गाडी रजिस्टर्ड आहे. आतापर्यंत या गाडीनं 44 हजार किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे.

  Hyundai i10 ERA -

  पांढऱ्या रंगाची ह्युंदाईची ही कार सेकंड हँड सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. हरियाणाच्या HR-12-R आरटीओमध्ये नोंदणीकृत असलेली ही कार पहिल्या मालकाने विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. 2011 चं मॉडेल असलेली ही गाडी 'Cars24'वर 1.88 लाख रुपयांना उपलब्ध आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या कारचा 2022 पर्यंतचा विमा उतरवण्यात आला आहे.

  Ola E-Scooter: फॅक्ट्रीमध्ये कशी बनते ओला ई-स्कूटर, पाहा VIDEO

  Renault Kwid RXL -

  रेनॉल्टची ही गाडी सेकंड हँड सेगमेंटमध्ये 'Cars24'वर उपलब्ध आहे. या गाडीचं मॉडेल 2017 सालचं आहे. फर्स्ट ओनरने विक्रीसाठी उपलब्ध केलेली ही कार फक्त 2.35 लाख रुपयांना खरेदी करता येईल. या गाडीमध्ये युजर्सना अनेक चांगले फीचर्स मिळतील. सिल्व्हर कलरच्या या कारचं पासिंग हरियाणाचं ( HR-02) आहे.

  Zero Down Payment मध्ये इथे मिळतेय Maruti Swift, पाहा फीचर्स आणि ऑफर

  Maruti Wagon R 1.0 VXI MANUAL -

  या गाडीची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र कार्स 24 नावाच्या वेबसाइटवर ही सेकंड हँड कार फक्त 2.60 लाख रुपयांना उपलब्ध आहे. 2012 चं मॉडेल असलेली ही गाडी दिल्लीतील DL-6C आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे.

  वरील सर्व गाड्या सेकंड हँड सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. कमी पैशांत, बजेटमध्ये गाडी खरेदी करण्याची इच्छा असेल तर या गाड्यांचा विचार करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Car