मुंबई, 7 जानेवारी- रेडमीच्या स्मार्टफोनला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अर्थात त्याला कारण आहे, या स्मार्टफोनची किंमत! जर तुम्हीही कमी बजेटमध्ये चांगली फीचर्स असणाऱ्या फोनची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेडमीनं नवीन स्मार्टफोन Redmi 12C लाँच केला आहे. रेडमीच्या या नवीन फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स नेमकी काय आहेत, त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
जर तुम्ही बजेट स्मार्टफोनची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. रेडमी कंपनीनं Redmi 12C लाँच केला आहे, जो भारतात सध्या असणाऱ्या Redmi A1 सीरिज सारखाच आहे. हा स्मार्टफोन एंट्री लेव्हल बजेट असलेल्या युजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. रेडमीचा हा नवा स्मार्टफोन MediaTekHelio G85 प्रोसेसरसह आहे. यामध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. चला तर, जाणून घेऊया रेडमीच्या या नवीन एंट्री लेव्हल डिव्हाइसची किंमत आणि त्याची इतर फीचर्स.
(हे वाचा:दमदार फीचर्ससह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S22 FE; वाचा डिटेल्स )
ही आहेत फीचर्स
Redmi 12C मध्ये 6.71 इंचाचा HD+ रिझोल्युशन डिस्प्ले आहे. स्क्रीन 20.6:9 च्या अॅस्पेक्ट रेशो सह येते. डिस्प्लेचा कमाल ब्राइटनेस 500 Nits आहे. स्मार्टफोनला ड्यू ड्रॉप नॉच उपलब्ध आहे. हँडसेट MediaTek Helio G85 प्रोसेसर सह येतो, ज्यामध्ये 6GB पर्यंत रॅमचा ऑप्शनसुद्धा आहे. हँडसेटमध्ये 128GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे, जो तुम्हाला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे, जो एलईडी फ्लॅशसह येतो. फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या मागील बाजूस उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे.
किती आहे किंमत?
कंपनीनं सध्या हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. हँडसेटचा बेस व्हेरिएंट 4GB रॅम व 64GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 699 युआन (सुमारे 8,400 रुपये) आहे. तर 4GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 799 युआन (सुमारे 9,600 रुपये) आहे. हँडसेट टॉप व्हेरिएंट 6GB रॅम व 128GB स्टोरेज सह येत असून त्याची किंमत 899 युआन (सुमारे 10,800 रुपये) आहे. हा स्मार्टफोन शॅडो ब्लॅक, मिंट ग्रीन, सी ब्लू आणि लव्हेंडर कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
भारतात हा फोन कधी लाँच केला जाईल, ही माहिती सध्यातरी देण्यात आली नाही. पण जेव्हा हा फोन भारतामध्ये लाँच होईल, तेव्हा बजेटमध्ये चांगले फीचर्स असणारा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Redmi, Smartphones, Technology