मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

दमदार बॅटरीसह realme चा नवीन बजेट फोन सज्ज, जाणून घ्या याचे फीचर्स

दमदार बॅटरीसह realme चा नवीन बजेट फोन सज्ज, जाणून घ्या याचे फीचर्स

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

दमदार बॅटरी आणि बजेट फोन आता लवकरच बाजारात. जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि बरंच काही

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 14 सप्टेंबर : स्मार्टफोन ही आता गरजेची वस्तू बनली आहे. बहुतांश बाबी ऑनलाइन झाल्यामुळे साहजिकच स्मार्टफोन युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कंपन्या वैविध्यपूर्ण फीचर्स असलेले स्मार्टफोन्स सातत्यानं लॉंच करत असतात. रिअलमीने मंगळवारी भारतीय बाजारात रिअलमी नार्जो 50 आय प्राइम हा नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. त्यात दमदार बॅटरी हे त्याचे प्रमुख फीचर आहे असं म्हणता येईल. हा फोन ग्राहकांसाठी दोन कलर्समध्ये उपलब्ध असेल.

रिअलमी कंपनीने मंगळवारी भारतात रिअलमी नार्जो 50 आय प्राइम हा नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन आणि रिअलमी इंडिया या वेबसाइट्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. भारतात 23 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 सेल सुरू होत आहे.

सेल सुरू होताच हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. तथापि, अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्स 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता नार्जो 50 आय प्राइम खरेदी करू शकतील.

हे वाचा : Tecno Smartphone: चक्क रंग बदलणारा स्मार्टफोन 3 दिवसांनी होणार लाँच, झक्कास फीचर्स, किंमतही कमी

रिअलमी नार्जो 50 आय प्राइम या नव्या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे पाच दिवसांपर्यंत ऑडिओ प्लेबॅक कालावधी मिळेल. या फोनमध्ये 6.5 इंच आकाराच्या डिस्प्ले असून, 88.7 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो आणि 400 निट्स ब्राइटनेस ही वैशिष्ट्यं आहेत. नार्जो 50 आय प्राइममध्ये ऑक्टा कोर Unisoc T612 Soc प्रोसेसर असेल.

ऑपरेटिंग सिस्टिमविषयी बोलायचं झालं, तर हा फोन अँड्रॉइड 11 वर बेस्ड Realme UI Go Edition या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालेल. या स्मार्टफोनमध्ये आठ मेगापिक्सेलचा AI मेन कॅमेरा आहे. तसंच, पुढच्या बाजूला पाच मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

हे वाचा : इतर देशांच्या तुलनेत भारतात iPhone महाग का? ही आहेत 2 महत्त्वाची कारणं

नार्जो 50 आय प्राइममध्ये ड्युएल सिम आणि डेडिकेटेड मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज देण्यात आलं असून, स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येतं. या फोनची लांबी 8.5mm आणि वजन 182 ग्रॅम आहे. हा फोन ग्राहकांसाठी डार्क ब्ल्यू आणि मिंट ग्रीन या दोन कलर्समध्ये उपलब्ध असेल.

रिअलमी नार्जो 50 आय प्राइमच्या किमतीविषयी बोलायचं झालं तर, 3GB रॅम आणि 32 GB स्टोरेज असलेल्या व्हॅरिएंटची किंमत 7999 रुपये आहे. तसंच, 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 8999 रुपये आहे. तुम्ही सध्या नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दमदार बॅटरी असलेला हा नवा फोन नक्कीच उत्तम पर्याय ठरू शकतो.

First published:

Tags: Marathi news, Mobile Phone, Phone, Tech news