जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / इतर देशांच्या तुलनेत भारतात iPhone महाग का? ही आहेत 2 महत्त्वाची कारणं

इतर देशांच्या तुलनेत भारतात iPhone महाग का? ही आहेत 2 महत्त्वाची कारणं

इतर देशांच्या तुलनेत भारतात iPhone महाग का? ही आहेत 2 महत्त्वाची कारणं

अमेरिकेच्या (American Market) तुलनेत भारतातल्या आयफोनच्या किमती 16 हजार रुपयांनी जास्त आहेत. आयफोन 14 ची अमेरिकी बाजारातील किंमत 799 डॉलर (सुमारे 63,700 रुपये) आहे. हाच फोन भारतीय बाजारात 79,900 रुपयांना मिळतो

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 10 सप्टेंबर : अ‍ॅपलने (Apple iPhone) नुकतीच आयफोन 14 ची सीरिज लाँच केली. या सीरिजमध्ये 4 स्मार्टफोन्स आहेत. आयफोन 14च्या (iPhone 14) लूकची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. सॅमसंग, व्हिवो, वन प्लस अशा अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्समध्ये स्पर्धा सुरू असते. फोनचा दर्जा, त्यातले पार्ट्स, सुरक्षा या सगळ्याच बाबतीत अ‍ॅपल कंपनी सगळ्यात पुढे असते. अ‍ॅपल आयफोनच्या किमतीही जास्त असतात. अमेरिका किंवा इतर देशांच्या तुलनेत भारतात या किमती जास्त आहेत. त्यामागे नेमकी कारणं (Why iPhones Are Costly In India) काय आहेत, हे जाणून घेऊ या. याबाबत माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. इयरफोनच्या वायरचा का होतो गुंता? 99 टक्के लोकांना माहिती नसेल कारण आयफोन भारतात असेंबल केले गेले, तर त्यांची किंमत कमी होईल असा अंदाज होता; मात्र आयफोन 12 व 13 सध्या भारतातच असेंबल होत असूनही त्यांच्या किमती कमी झालेल्या नाहीत. त्यात आता अ‍ॅपलने आयफोन 14 लाँच केला आहे. या सीरिजमध्ये चार वेगवेगळ्या किमतींचे स्मार्टफोन्स आहेत. अमेरिकेच्या (American Market) तुलनेत भारतातल्या आयफोनच्या किमती 16 हजार रुपयांनी जास्त आहेत. आयफोन 14 ची अमेरिकी बाजारातील किंमत 799 डॉलर (सुमारे 63,700 रुपये) आहे. हाच फोन भारतीय बाजारात 79,900 रुपयांना मिळतो. दोन्ही देशांतल्या किमतींत 16,200 रुपयांचा फरक आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, भारतात फोन असेंबल केल्यानं आयफोनच्या किमती कमी होणार नाहीत. त्याचं कारण OEMs (Original Equipment Manufacturer) म्हणजेच फोनचे पार्ट्स तयार करणाऱ्या कंपन्यांना त्यावर खूप जास्त आयात कर भरावा लागतो. आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या PCBAवर (Printed Circuit Board Assembly) 20 टक्के आयात कर असतो. आयफोनच्या चार्जरवरही 20 टक्के आयात कर असतो. त्याशिवाय 18 टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे आयफोनच्या किमती भारतात जास्त असतात. Smartphone on Discount: तब्बल 8 हजारांनी स्वस्त मिळतोय 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन, वाचा फीचर्स अन् डिटेल्स डॉलर आणि रुपयांच्या किमतीतली तफावतही यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळेच दुबई आणि जपानच्या तुलनेतही भारतात आयफोन महाग असतात. PCBA सारख्या पार्ट्सचं उत्पादन भारतात होत नाही, तोवर आयफोनच्या किमती कमी होणार नाहीत. आयात कर व जीएसटी यामुळे किमती वाढतात. सगळ्याच आयफोन्सच्या किमतीत अशी तफावत दिसते. नवीन आयफोनच्या किमतीही अमेरिकेत तुलनेनं कमी आहेत. भारतात आयफोन SE 2022 आतापर्यंत 43900 रुपयांना (सध्या 49900 रुपयांना मिळतो) मिळत होता. अमेरिकेत हा फोन 32 हजार रुपयांना मिळतो. म्हणजेच भारतीय बाजारात कंपनी तब्बल 10 हजार रुपये जास्त किमतीनं हा फोन विकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: apple , iphone
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात