Home /News /auto-and-tech /

शाओमीला रिअलमीची टक्कर; लॉन्च झाला GT 5G Master Smartphone

शाओमीला रिअलमीची टक्कर; लॉन्च झाला GT 5G Master Smartphone

हा फोन शाओमीच्या 11X Pro 5G शी स्पर्धा (Xiaomi 11X Pro 5G) करत असून, याची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. गेल्याच महिन्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778 एसओसी आणि मागील बाजूस ट्रिपल कॅमेरे असलेली रिअलमी जीटी मास्टर एडिशन दाखल करण्यात आली होती.

पुढे वाचा ...
    मुंबई 18 ऑगस्ट: रिअलमी (Realme) या आघाडीच्या स्मार्टफोन उत्पादक कंपनीनं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन (Flagship Smartphone) ‘Realme GT 5G’ आणि ‘Realme GT Master Edition’ भारतात (India) दाखल केली आहे. ‘Realme GT 5G’ या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये आणि त्यानंतर जूनमध्ये तो जागतिक स्तरावर दाखल करण्यात आला होता. स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर चालणारा हा जगातील सर्वांत स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. ‘Realme GT 5G’ 25 ऑगस्टपासून तर ‘Realme GT Master Edition’ 26 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमी चॅनेलवर उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे कंपनीनं या स्मार्टफोन बरोबर Realme Book Slim हा लॅपटॉपदेखील दाखल केला आहे. हा फोन शाओमीच्या 11X Pro 5G शी स्पर्धा (Xiaomi 11X Pro 5G) करत असून, याची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. गेल्याच महिन्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778 एसओसी आणि मागील बाजूस ट्रिपल कॅमेरे असलेली रिअलमी जीटी मास्टर एडिशन दाखल करण्यात आली होती. रिअलमी जीटी सीरिज रिअलमी एक्स-सीरीजची जागा घेत असल्याचं रिअलमी इंडियाचे (Realme India) सीईओ माधव शेठ (Madhav Sheth) यांनी म्हटलं आहे. Realme GT 5G हा स्मार्टफोन डॅशिंग सिल्व्हर आणि डॅशिंग ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध असून, याव्यतिरिक्त ग्राहक पिवळ्या आणि काळ्या रंगाचे फिनिशिंग असणारे प्रीमियम वेगन लेदरमधील रेसिंग यलो कलरचे (Racing Yellow ) व्हेरिएंटही खरेदी करू शकतील. या फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल-एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट120हर्टझ आहे. यात क्वालकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट असून, 12GB LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत 3.1 UFS अंतर्गत स्टोअरेज आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून, त्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर (Sony IMX682), 8-मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. Realme GT 5Gमध्ये ड्युअल-मोड 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2, GPS आणि 4500mAh ची बॅटरी आहे. USB Type-C पोर्टद्वारे 65W फास्ट चार्जिंगची सुविधा यात आहे. 3.5 मिमी ऑडिओ जॅक हे याचे खास वैशिष्ट्य आहे. भारतात या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत 37हजार 999 रुपयांपासून सुरू होते. तर रेसिंग यलो लेदर फिनिशमधील12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत 41हजार 999 रुपये आहे. तर रिअलमी जीटी मास्टर एडिशनमध्ये (Realme GT Master Edition) 6.43-इंच फुल-एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आणि टच सॅम्पलिंग रेट 360 हर्ट्ज आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778 SoC चिपसेट आहे. 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोअरेज असून, यात 4,300mAh ची बॅटरी आहे. यातही ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल शूटर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. या एडिशनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी स्नॅपरदेखील आहे. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत 25 हजार 999 रुपये, 8GB रॅम आणि 128GB स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत 27 हजार 999 रुपये आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत 29 हजार 999 रुपये आहे.
    First published:

    Tags: Smartphone, Techonology

    पुढील बातम्या