मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Paytm चा मोठा निर्णय; संचालक मंडळावरून 11 चिनी नागरिकांना केलं बेदखल

Paytm चा मोठा निर्णय; संचालक मंडळावरून 11 चिनी नागरिकांना केलं बेदखल

फिनटेक क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या पेटीएमचा (Paytm) आयपीओ (IPO) लवकरच शेअर बाजारात दाखल होणार आहे.

फिनटेक क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या पेटीएमचा (Paytm) आयपीओ (IPO) लवकरच शेअर बाजारात दाखल होणार आहे.

फिनटेक क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या पेटीएमचा (Paytm) आयपीओ (IPO) लवकरच शेअर बाजारात दाखल होणार आहे.

  नवी दिल्ली, 7 जुलै : फिनटेक क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या पेटीएमचा (Paytm) आयपीओ (IPO) लवकरच शेअर बाजारात दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पेटीएम कंपनीच्या संचालक मंडळावर असलेल्या 11 चिनी नागरिकांच्या (Chinese Nationals) जागी अमेरिकी (US Citizens) आणि भारतीयांचा (Indians) समावेश करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. हा बदल झाला असला, तरी सध्याच्या शेअरहोल्डिंगमध्ये काहीही बदल झालेला नाही, असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी पेटीएम या कंपनीच्या संचालक मंडळावर कोणीही चिनी नागरिक नाही.

  अलीपे (Alipay), अँट फायनान्शियल्स (Ant Financials) आणि अलिबाबा (Alibaba) या कंपन्यांच्या सदस्यांना पेटीएमच्या संचालक मंडळावरून (Board of Directors) काढून टाकण्यात आलं आहे. अलीपेचे जिंग शिअनडाँग, अँट फायनान्शियल्सचे गोमिंग चेंग, अमेरिकी नागरिक असलेले मायकेल युएन जेन याओ आणि टिंग हाँग केन्नी हो अशा दिग्गजांना संचालक मंडळावरच्या त्यांच्या जागा सोडाव्या लागल्या आहेत.

  हे ही वाचा-वारंवार कॉल्स,SMS करुन त्रास देणाऱ्यांना लागणार चाप;भरावा लागेल 10000 पर्यंत दंड

  रॉयटर्स कंपनीला मिळालेल्या कंपनीच्या फायलिंगवरच्या माहितीनुसार, सामा कॅपिटल कंपनीचे अशित रणजित लिलानी आणि सॉफ्टबँक कंपनीचे प्रतिनिधी विकास अग्निहोत्री यांना पेटीएम कंपनीच्या संचालक मंडळावर घेण्यात आलं आहे. अँट ग्रुपचे संचालक मंडळावरचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेचे नागरिक असलेल्या डग्लस फीगिन यांची निवड झाल्याचे संकेतही रॉयटर्सच्या वृत्तात देण्यात आले आहेत.

  चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत पेटीएम कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात येणार असून, त्यातून 2.3 अब्ज डॉलर एवढा निधी उभारला जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये यासाठी नोंदणी करण्याचं कंपनीचं नियोजन आहे. त्या वेळी कंपनीचं सर्वसाधारण मूल्यांकन (Valuation) 25 ते 35 अब्ज डॉलर एवढं असेल. सॉफ्टबँक आणि अँट फायनान्शियल्स यांनी पेटीएममध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर 2019मध्ये पेटीएम कंपनीचं मूल्यांकन केवळ 16 अब्ज डॉलर एवढंच होतं.

  सॉफ्टबँक व्हिजन फंड या कंपनीकडे पेटीएमचे 19.63 टक्के शेअर्स आहेत. तसंच, अँट फायनान्शियल्स या कंपनीकडे 29.71 टक्के शेअर्स आहेत. सैफ पार्टनर्सकडे 18.56 टक्के शेअर्स असून, विजय शेखर शर्मा यांच्याकडे स्वतःकडे पेटीएम कंपनीचे 14.67 टक्के शेअर्स आहेत. त्याशिवाय एजीएच होल्डिंग, टी रोवे प्राइस, डिस्कव्हरी कॅपिटल, बर्कशायर हाथवे आदी कंपन्यांकडे पेटीएमचे 10 टक्क्यांहून कमी शेअर्स आहेत.

  हे ही वाचा-Educational Documents हरवले? आता नो टेन्शन, एका क्लिकवर मिळणार नवी कागदपत्रं

  वन 97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) ही पेटीएमची पॅरेंट कंपनी असून, ती नव्या शेअर्सच्या विक्रीतून 12 हजार कोटी रुपये (1.6 अब्ज डॉलर्स) एवढा निधी उभारणार आहे. 12 जुलै रोजी या कंपनीची विशेष सर्वसाधारपण सभा होणार असून, त्यात या निर्णयाला मंजुरी मिळवण्याचं कंपनीचं नियोजन असल्याचं रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे. पेटीएमच्या तीन अब्ज डॉलर्सच्या आयपीओसाठी संचालक मंडळाकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. विद्यमान शेअरहोल्डर्सच्या इक्विटी शेअर्सच्या (Equity Shares) विक्रीतून कंपनी आणखी 4600 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओसाठी आवश्यक कागदपत्रं येत्या आठवड्यात सादर करण्यासाठी कंपनी तयारीत आहे.

  याच बरोबरीने पेटीएम कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफर फॉर सेलच्या (Offer for sale) माध्यमातून या ऐतिहासिक आयपीओमध्ये सहभागी करून घेत असून, त्यांच्या शेअर्सची विक्री करण्याची संधीही देणार असल्याचं ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटलं आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात पेटीएम कंपनीने 3186.60 कोटी रुपयांची उलाढाल केली. 2019-20मध्ये कंपनीला 2942.36 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 2020-21मध्ये तोटा 42 टक्क्यांनी घटून 1701 कोटी रुपयांवर आला आहे.

  First published:
  top videos

   Tags: China, Paytm, Paytm Money