मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

कार विकण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या, अन्यथा पैसे पाण्यात!

कार विकण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या, अन्यथा पैसे पाण्यात!

भारतातली पहिली फ्लेक्स-फ्युएल कार 28 सप्टेंबरला होणार लाँच, काय होईल फायदा? वाचा सविस्तर

भारतातली पहिली फ्लेक्स-फ्युएल कार 28 सप्टेंबरला होणार लाँच, काय होईल फायदा? वाचा सविस्तर

काय काय काळजी घ्याल?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : नवीन कार खरेदी करण्यापूर्वी आपण जुन्या कारची विक्री करतो. जुनी कार विकताना आपण अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करतो. काही वर्षांपूर्वी टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. यामुळे लोकांचा बराच वेळ वाया जायचा. यावर उपाययोजना म्हणून सरकारने फास्टॅग ही नवीन प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे टोल प्लाझावरील वाहनांच्या रांगा कमी होऊ लागल्या. टोल भरण्यासाठी फास्टॅग फायदेशीर ठरले. पण, तुम्ही कारसाठी घेतलेली ही सुविधा कार विकताना डिअ‍ॅक्टिव्हेट केली नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. फास्टॅग हे तुमच्या बॅंक खात्याशी कनेक्ट असतं. त्यामुळे कार विक्री करताना ते बंद केलं नाही तर कारचा नवीन खरेदीदार त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे फास्टॅग अकाउंट बंद करणं आवश्यक आहे. टीव्ही नाइन हिंदीने याविषयीची माहिती दिली आहे.

टोल प्लाझावरील टोलसाठी लागलेल्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी सरकारने फास्टॅग सुविधा सुरू केली. फास्टॅग ही एक डिजिटल पेमेंट सुविधा आहे. फास्टॅग हे तुमच्या बॅंक अकाउंटशी लिंक असतं. फास्टॅग हे अधिकृत जारीकर्ता किंवा यात सहभागी बॅंकेकडून खरेदी केलं जातं. या सुविधेच्या माध्यमातून टोल प्लाझावर ऑटोमॅटिक पेमेंट होतं. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या जुन्या कारसाठी ही सुविधा घेतली असेल आणि ही कार तुम्ही विकत असाल तर विक्रीपूर्वी फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. यासाठी खास अशी प्रक्रिया आहे.

जर तुम्हाला फास्टॅग सुविधा डिअ‍ॅक्टिव्हेट अर्थात बंद करायची असेल तर तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कस्टमर केअर क्रमांकावर फोन करून ही सुविधा बंद करण्याबाबत सांगू शकता. तुम्ही जर आयसीआयसीआय बँकेकडून फास्टॅग घेतलं असेल तर 18002100104 या क्रमांकावर फोन करावा. येथे तुम्हाला फास्टॅग बंद करण्याची प्रक्रिया सांगितली जाईल. पेटीएमशी 18001204210 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमचं फास्टॅग अकाउंट बंद करू शकता. त्याचप्रमाणे अ‍ॅक्सिस बॅंकेला 18004198585 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमचं फास्टॅग अकाउंट बंद करू शकता. एअरटेल पेमेंट्स बॅंकेकडून फास्टॅग सुविधा घेतली असेल तर अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही 8800688006 या क्रमांकावर फोन करावा. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर तुम्हाला फास्टॅग बंद करण्याची प्रक्रिया सांगितली जाईल. एचडीएफसी बॅंकेची सुविधा असेल तर 18001201243 या क्रमांकावर कॉल करावा. येथे तुम्हाला फास्टॅग सुविधा बंद करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली जाईल.

याशिवाय केंद्र सरकारच्या 1033 या हेल्पलाइन क्रमांवर कॉल करून तुम्ही फास्टॅगशी निगडीत सर्व शंकांचे निरसन करून घेऊ शकता. तसेच एनएचएआयला (आयएचएमसीएल) 1033 या क्रमांकावर कॉल केलात तर तुम्हाला फास्टॅग बंद करण्याची प्रक्रिया सांगितली जाते.

दरम्यान, फास्टॅगची सुविधा सुरू केल्यानंतर तुमच्या कारवर एक स्टिकर लावला जातो. टोल प्लाझावर कार आली की त्यातून ऑटोमेटिक पेमेंट होतं. फास्टॅग हे तुमच्या बॅंक खात्याशी लिंक असते. या सर्व गोष्टी लक्षात घेत पुढील नुकसान टाळण्यासाठी कार विक्री करताना फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट करणं गरजेचं आहे, अन्यथा कारचा नवीन खरेदीदार याचा लाभ घेऊ शकतो आणि तुमच्या अकाउंटमधून पेमेंट करू शकतो. तसेच जोपर्यंत तुम्ही तुमची फास्टॅग सुविधा बंद करत नाही तोपर्यंत नवा कार मालक फास्टॅगसाठी अर्ज करू शकणार नाही. त्यामुळे जुनी कार विक्री करण्यापूर्वी फास्टॅग बंद करणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Car, Sale, Tech news