नवी दिल्ली, 14 डिसेंबर : Ola CEO भाविश अग्रवाल यांनी (CEO Bhavish Aggarwal) ‘Gaddi nikal chuki’ या कॅप्शनसह ट्विट करत Ola S1 आणि S1 Pro ची डिलीव्हरी कधी होणार याबाबत खुलासा केला आहे. Ola S1 स्कूटरची 15 डिसेंबरपासून डिलीव्हरी सुरू होणार आहे. अग्रवाल यांनी एक व्हिडीओ पोस्ट केली असून, त्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटर फ्यूचर फॅक्ट्रीमध्ये डिलीव्हरीसाठी तयार होत असल्याचं दिसतं आहे. व्हिडीओच्या शेवटी ओला इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जाणारा एक ट्रक फॅक्ट्रीतून डिलीव्हरीसाठी निघताना दिसतो आहे. तमिळनाडूमध्ये कंपनीच्या फ्यूचर फॅक्ट्रीमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली जात आहे.
Gaddi nikal chuki!
— Bhavish Aggarwal (@bhash) December 13, 2021
🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵🛵 pic.twitter.com/ZjttmnqBZo
Ola Electric ने OLA S1 आणि Ola S1 Pro असे दोन इलेक्ट्रिक स्कूटर वेरिएंट लाँच केले आहेत. Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे. तर S1 Pro कंपनीचं टॉप मॉडेल वेरिएंट असून याची किंमत 1,29,999 रुपये आहे. OLA S1 स्कूटर 2,999 रुपयांच्या मासिक हप्त्यात उपलब्ध होईल. तर S1 Pro साठी ईएमआय 3,199 रुपयांपासून सुरू होईल. फायनान्सची गरज नसल्यास, Ola S1 साठी 20000 रुपये आणि Ola S1 Pro साठी 25000 रुपये अॅडव्हान्स पेमेंट करू शकता. इतर रक्कम स्कूटर इनवॉईस दरम्यान द्यावी लागेल. देशातील चार राज्य इलेक्ट्रिक वाहनावर आणखी वेगळी सबसिडी देत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यातील लोकांना सबसिडीचा फायदा मिळू शकतो. महाराष्ट्रात Ola S1 - 94,999 आणि Ola S1 Pro - 1,24,999 रुपयांत खरेदी करता येईल.
Ola E-Scooter खरेदी करायचा विचार करताय? पाहा किती भरावा लागेल EMI
Ola S1 Pro ची बॅटरी क्षमता 3.97 kWh आहे. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6.30 तास लागतात. कंपनीचा दावा आहे की S1 Pro ची बॅटरी 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. बॅटरी अर्धी चार्ज केली तरी स्कूटर 75 किमी पर्यंत जाऊ शकते.
Ola E-Scooter: फॅक्ट्रीमध्ये कशी बनते ओला ई-स्कूटर, पाहा VIDEO
Ola S1 मध्ये 2.98 किलोवॅट बॅटरी पॅक असून S1 Pro स्कूटरमध्ये 3.97 किलोवॅट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. OLA S1 एकदा फुल चार्ज केल्यावर 120 किलोमीटर पर्यंत चालवली जाऊ शकते. याचा टॉप स्पीड ताशी 90 किमी आहे. ओला S1 प्रो एका चार्जमध्ये 180 किलोमीटरपर्यंत चालवली जाऊ शकते. याचा टॉप स्पीड ताशी 115 किमी आहे.