जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Mercedes-Benz ने लाँच केली 'मेड इन इंडिया' S-Class, पुण्यात होणार निर्मिती; वाचा काय आहे किंमत

Mercedes-Benz ने लाँच केली 'मेड इन इंडिया' S-Class, पुण्यात होणार निर्मिती; वाचा काय आहे किंमत

Mercedes-Benz ने लाँच केली 'मेड इन इंडिया' S-Class, पुण्यात होणार निर्मिती; वाचा काय आहे किंमत

मर्सिडिझ-बेंझने भारतात त्यांची फ्लॅगशिप मेड इन इंडिया (Made in India Mercedes S-Class) अल्ट्रा लग्झरी सेडान एस-क्लास (S-Class) लाँच केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 07 ऑक्टोबर: मर्सिडिझ-बेंझने भारतात त्यांची फ्लॅगशिप मेड इन इंडिया (Made in India Mercedes S-Class) अल्ट्रा लग्झरी सेडान एस-क्लास (S-Class) लाँच केली आहे. भारतातील ही सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक कंपनी Mercedes S-Class भारतातच असेंबल करत आहे. याची निर्मिती पुण्याजवळील मर्सिडिझच्या चाकण प्लांटमध्ये केली जात आहे. मर्सिडीझ एस-क्लासच्या मेड इन इंडिया व्हर्जनमध्ये सीबीयू मॉडेलच्या तुलनेत बदल दिसतील. कंपनीच्या चाकण प्लांटमध्ये आतापर्यंत स्थानिक पातळीवर उत्पादित 1.3 लाख मर्सिडीझ-बेंझ कारचे उत्पादन करण्यात आले आहे. काय आहे किंमत? स्थानिक पातळीवर बनवलेल्या या S-क्लासची किंमत S 350 d साठी 1.57 कोटी रुपयांपासून तर S 450 4MATIC साठी 1.62 कोटी रुपयांपासून सुरू होत आहे.  यापूर्वी, एस-क्लास 350 डीची भारतात किरकोळ किंमत 2.17 कोटी  होती तर S 450 4MATIC  2.19 कोटींमध्ये लाँच करण्यात आली होती. दरम्यान आता यानंतर मर्सिडीज बेंझ भारतात 13 मॉडेल तयार करते. मर्सिडीज-बेंझ इंडियाने भारतीय ग्राहकांना एस-क्लासच्या 8250 पेक्षा जास्त युनिटची विक्री केली आहे. वाचा- केवळ 24000 रुपयांत Bajaj Pulsar खरेदी करण्याची संधी, पाहा काय आहे ऑफर S-class च्या CBU लाँचला भारतात भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कंपनी आता देशात मेड इन इंडिया व्हर्जन घेऊन आली आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ मार्टिन श्वेंक (Martin Schwenk, Managing Director & CEO, Mercedes-Benz India) म्हणाले की, ई-क्लास (E-Class) आणि जीएलसी (GLC) हे मर्सिडीज-बेंझ इंडियाचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहेत. Mercedes-Benz India ने दिलेल्या माहितीनुसार, S-Class उत्पादनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचा वापर करण्यात आला आहे. ड्रायव्हर आणि पॅसेंजर्ससाठी असणाऱ्या आवश्यकता आणि इच्छा लक्षात घेता याचे डिझाइन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car
  • First Published :
जाहिरात
जाहिरात