मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

आता या Social Media App साठी वापरकर्त्यांना द्यावे लागतील पैसे!

आता या Social Media App साठी वापरकर्त्यांना द्यावे लागतील पैसे!

सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम अशी अनेक अ‍ॅप्स खूप लोकप्रिय आहेत. बहुतांश जण ही अ‍ॅप्स वापरतात. वापरण्यासाठी सहज, सोपी आणि कोणतंही शुल्क नसल्यामुळे अनेक ग्राहक ती वापरतात.

सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम अशी अनेक अ‍ॅप्स खूप लोकप्रिय आहेत. बहुतांश जण ही अ‍ॅप्स वापरतात. वापरण्यासाठी सहज, सोपी आणि कोणतंही शुल्क नसल्यामुळे अनेक ग्राहक ती वापरतात.

सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम अशी अनेक अ‍ॅप्स खूप लोकप्रिय आहेत. बहुतांश जण ही अ‍ॅप्स वापरतात. वापरण्यासाठी सहज, सोपी आणि कोणतंही शुल्क नसल्यामुळे अनेक ग्राहक ती वापरतात.

नवी दिल्ली, 11 जून : सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम अशी अनेक अ‍ॅप्स खूप लोकप्रिय आहेत. बहुतांश जण ही अ‍ॅप्स वापरतात. वापरण्यासाठी सहज, सोपी आणि कोणतंही शुल्क नसल्यामुळे अनेक ग्राहक ती वापरतात. टेलिग्राम हे एक लोकप्रिय अ‍ॅप; पण टेलिग्रामने (Telegram App) त्यांच्या काही फीचर्ससाठी आता पैसे आकारायचं (Paid Subscription) ठरवलं आहे. त्यामुळे टेलिग्रामच्या ग्राहकांना थोडा भुर्दंड सोसावा लागू शकतो. त्यांची ही सेवा जून 2022 मध्ये सुरू होणार आहे. 'झी न्यूज हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काही दिवसांपूर्वी टेलिग्राम त्यांची सबस्क्रिप्शन ऑफर सुरू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या ऑफरमध्ये टेलिग्रामची काही फीचर्स पेड अर्थात पैसे देऊन ग्राहकांना वापरायला मिळणार होती. याला टेलिग्राम प्रीमिअम असं नाव देण्यात आलं आहे. ही सेवा याच महिन्यात (June 2022) सुरू करणार असल्याचं टेलिग्रामनं सांगितलं आहे. टेलिग्रामच्या प्रीमिअम (Telegram Premium) सबस्क्रिप्शनमध्ये काय असेल आणि काय नसेल, याबाबत टेलिग्रामच्या सीईओनी माहिती दिली आहे. टेलिग्राममध्ये सध्या असलेली सगळी फीचर्स ग्राहकांना मोफतच वापरता येतील. टेलिग्राम प्रीमिअमसाठी (Telegram Premium) नवीन फीचर्स तयार करण्यात आली आहेत. त्याचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना पैसे भरून सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, असं टेलिग्रामचे सीईओ डुरोव (Telegram CEO Durov ) यांचं म्हणणं आहे. टेलिग्राम प्रिमिअमचं सबस्क्रिप्शन घेतलं नाही, तरी टेलिग्रामवरची अनेक फीचर्स ग्राहकांना वापरता येतील. तसंच प्रीमिअम ग्राहकांनी पाठवलेली डिजिटल कागदपत्रं, मीडिया आणि स्टिकर्स हेही पाहता येऊ शकेल. इतर गोष्टींबाबत टेलिग्रामकडून माहिती मिळाली असली, तरी प्रीमिअम सेवा जून महिन्यात नक्की कधी सुरू होणार याबाबत कंपनीनं काही सांगितलं नाहीये. तसंच सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सबस्क्रिप्शनसाठी किती पैसे आकारण्यात येणार आहेत, तेही अजून गुलदस्त्यात आहे. टेलिग्राम हे मेसेजिंग अ‍ॅप आहे. 2013मध्ये ते सुरू करण्यात आलं. व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच चॅटिंग आणि व्हिडिओ व व्हॉइस कॉलिंगसाठी याचा उपयोग होतो. दुसऱ्या व्यक्तीला फाइल पाठवण्यासाठीही टेलिग्राम वापरता येऊ शकतं. भारतात अजूनही व्हॉट्सअ‍ॅपइतके टेलिग्रामचे ग्राहक नाहीत. परंतु ते वाढत आहेत हे निश्चित. त्यामुळे ज्यांना आता टेलिग्राम प्रीमिअम वापरायचं असेल, त्यांना यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. अर्थात त्यामध्ये ग्राहकांना काही खास फीचर्स कंपनी उपलब्ध करून देणार आहे. एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच प्रीमिअम सबस्क्रिप्शनची ऑफर आता टेलिग्रामच्या ग्राहकांना मिळणार आहे. चॅटिंग अ‍ॅप्सच्या स्पर्धेत टेलिग्राम ग्राहकांना नवीन फीचर्सचा अनुभव देणार आहे. त्यामुळे इतर कंपन्याही कदाचित लवकरच ग्राहकांसाठी काही नवीन फीचर्स आणू शकतात.

First published:

Tags: Social media app

पुढील बातम्या