मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वर मिळणार 105 रूपयांचा कॅशबॅक, ‘या’ स्टेप्स फॉलो करून घ्या तातडीनं फायदा

WhatsApp वर मिळणार 105 रूपयांचा कॅशबॅक, ‘या’ स्टेप्स फॉलो करून घ्या तातडीनं फायदा

व्हॉट्सअपनी  पेमेंट फिचरच्या (WhatsApp Pay) माध्यमातून युझर्सना 105 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे.

व्हॉट्सअपनी पेमेंट फिचरच्या (WhatsApp Pay) माध्यमातून युझर्सना 105 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे.

व्हॉट्सअपनी पेमेंट फिचरच्या (WhatsApp Pay) माध्यमातून युझर्सना 105 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे.

मुंबई, 11 जून : व्हॉट्सअ‍ॅप  (WhatsApp ) हा बहुतांश जणांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. युझर्सच्या सोयीसाीठी व्हॉट्सअ‍प फीचर्समध्ये वेळोवेळी अनेक बदल होत असतात आणि नवनवीन फीचर्सची त्यात भर पडत असते. आता तर व्हॉट्सअ‍ॅपवरून पेमेंटचीही सोय उपलब्ध झाली आहे. व्हॉट्सअपचं हे पेमेंट फीचर यशस्वी करण्यासाठी आणि Google Pay, PhonePe आणि Paytm यांसारख्या पेमेंट अ‍ॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी कंपनी सतत नवनवीन ऑफर्स आणत असते.

व्हॉट्सअपनी  पेमेंट फिचरच्या (WhatsApp Pay) माध्यमातून युझर्सना 105 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप पेद्वारे पैसे पाठवल्यास तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ही पूर्ण ऑफर काय आहे आणि तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता याबद्दल जाणून घेऊ या. या संदर्भात 'झी न्यूज हिंदी'ने हे वृत्त दिलं आहे.

या ऑफर अंतर्गत WhatsApp Pay युझर्सना एकूण 105 रुपयांची कॅशबॅक देत आहे. ही कॅशबॅक तीन पेमेंटवर मिळेल. प्रत्येक पेमेंटवर 35 रुपयांची कॅशबॅक दिला जाईल. अशा प्रकारे तुम्ही तीन वेळा पेमेंट करून 105 रुपयांची कॅशबॅक (Cash Back) मिळवू शकता. या ऑफरची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्ही किती रुपयांचं पेमेंट करावं, अशी कोणतीही अट नाही. तुम्ही अगदी एक रुपया पाठवूनही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ही ऑफर मर्यादित काळासाठी असल्याचं कंपनीचं स्पष्ट केलं आहे.

तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वांत आधी तुमचे WhatsApp Pay वर खातं असणं आणि त्यातलं UPI फीचर सक्रिय करणं आवश्यक आहे. यानंतर, तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp वर आता मेसेज सुद्धा एडिट करता येणार, येत आहे लवकरच नवे व्हर्जन!

सर्वांत आधी तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा.

त्यात WhatsApp Payment वर जा. तिथे तुम्हाला पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल.

पे या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत तो कॉन्टॅक्ट निवडा.

आता तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम टाका. खाली तुम्हाला पेमेंट नोटसाठी काही तरी लिहिण्याचा पर्याय दिसेल. तुम्हाला हवं असल्यास तिथे काही लिहा, नाही तर तुम्ही ते ब्लँक सोडू शकता.

यानंतर, नेक्स्टवर क्लिक करताच तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल.

पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल.

तुम्ही नवीन युझर असलात, तर सर्वांत आधी WhatsApp पे वर जा आणि तुमचं बँक खातं UPI शी लिंक करा. त्यानंतर वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि कॅशबॅकचा लाभ मिळवू शकता.

First published:

Tags: Money, Social media, Technology, Whatsapp, WhatsApp features, Whatsapp pay