मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /क्या बात है! आता इंटरनेटविना वापरता येणार Gmail, ही आहे सोपी पद्धत

क्या बात है! आता इंटरनेटविना वापरता येणार Gmail, ही आहे सोपी पद्धत

आता तुम्ही असे करू शकता. इंटरनेटविना यूजर जीमेल वापरू शकणार आहे.

आता तुम्ही असे करू शकता. इंटरनेटविना यूजर जीमेल वापरू शकणार आहे.

आता तुम्ही असे करू शकता. इंटरनेटविना यूजर जीमेल वापरू शकणार आहे.

इंटरनेट (Internet)) हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. इंटरनेटविना स्मार्टफोनमध्ये अनेक स्मार्ट फीचर्सचा उपयोग करता येत नाही. विशेषतः, जर तुम्ही ऑफिशियल यूजर असाल ज्यांना जीमेल (Gmail) वापरणे आवश्यक आहे त्यांना इंटरनेटशिवाय जीमेल कसे वापरता येईल? तर आता हे शक्य होणार आहे.

आता तुम्ही असे करू शकता. इंटरनेटविना यूजर जीमेल वापरू शकणार आहे. गुगलची मेल सेवा म्हणजे जीमेलमध्ये आता तुम्ही विना इंटरनेटसुद्धा मेल वाचू शकणार आहेत. इतकेच नव्हे तर आता तुम्हाला त्याला उत्तरही देता येणार आहे, तसेच इतर मेलसुद्धा तुम्हाला आता इंटरनेटविना सर्च करता येणार आहेत.

या सुविधेला जीमेल ऑफलाईन (Gmail Offline) असे म्हणतात. या सुविधेच्या मदतीने तुम्हाला आता इंटरनेटविना सुद्धा जी मेल वापरता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, ही सुविधा तुम्ही कशाप्रकारे वापरू शकता?

तुम्हाला यासाठी लक्षात ठेवावे लागेल की, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये क्रोम सेटअप असायला हवा. तुम्ही क्रोम ब्राउझरच्या विंडोमध्येच जीमेल ऑफलाइन उघडू शकता. लक्षात ठेवा की, तुम्हाला हे Incognito Mode मध्ये नाही करता येणार.

अशी असेल गुगलची सोपी सेटिंग -

सर्वात आधी यूजर्सला https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline या लिंकवर जावे लागेल.

याठिकाणी तुम्हाला ऑफलाईन मेल इनॅबल करावे लागेल.

आता यूजर्स त्यांच्या पसंतीनुसार सेटिंग बदलू शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला किती दिवसांचा डेटा सिंक करायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता.

हेही वाचा - क्या बात है! इलेक्ट्रीक सायकलवर मिळतेय एवढी सबसिडी; खरेदीपूर्वी जाणून घ्या 5 गोष्टी

यूजर्सना आता Save Change वर क्लिक करावे लागेल.

हे केल्यानंतर, वापरकर्त्यांचा इनबॉक्स बुकमार्क केला जाईल. याच्या मदतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन मोडमध्ये जीमेल ऍक्सेस करू शकाल. तुम्ही ऑफलाइन मोडमध्ये मेल पाठवताच, तो आउटबॉक्स फोल्डरमध्ये जाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यावर आपोआप पाठवला जाईल.

ऑफ देखील करू शकता -

तुम्ही हे फीचर अशा प्रकारे बंद देखील करू शकता. यासाठी तुम्हाला https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline या लिंकवर जावे लागेल. ऑफलाईन मोडच्या समोर दिसणारा बॉक्स अनचेक करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे विशेष फीचर बंद करू शकता.

First published:
top videos

    Tags: Gmail, Google, Internet