नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : कोणतंही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने (Central Government) ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता कार उत्पादक कंपन्या (Car Manufacture Companies), ऑटोमोबाइल असोसिएशन (Automobile Association) आणि एनजीओ (NGO) यांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र (Driving Training Center) सुरू करण्याची परवानगी असेल. या संस्था त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या उत्तीर्ण चालकांना ड्रायव्हिंग लायसेन्स (DL) देऊ शकणार आहेत.
त्यामुळे आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. वाहनांच्या नोंदणीसाठी (RC) मात्र आरटीओमध्ये (RTO) जावं लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही पूर्वीप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स देणंही सुरू राहणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, आता कार उत्पादक कंपन्या, ऑटोमोबाइल असोसिएशन आणि NGO ला देखील ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता या संस्था ड्रायव्हिंग टेस्टमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकणार आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याच्याशी निगडित सेवा-सुविधांविषयी सातत्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात. विशेषतः अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली -एनसीआर आणि झारखंडसारखी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी लर्निंग लायसन्स (Learning License) आणि वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन नियम लागू केले आहेत. तसंच काही राज्यांमध्ये अजूनही याकरता केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज स्वीकृती होते.
कोरोना काळानंतर, देशातल्या जवळपास सर्व राज्यांच्या परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्याकरता असणाऱ्या पद्धतीत बदल केला आहे. नव्या पद्धतीनुसार, आता स्लॉट बुकिंग (Slot Booking) झाल्यावर लगेच लर्निंग लायसन्ससाठी पैसे जमा करावे लागतात. पैसे जमा केल्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला चाचणी परीक्षेकरता तारीख दिली जाते.
लायसन्सशी संबंधित सेवांसाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जाऊन गरजेनुसार ड्रायव्हिंग लायसन्स सेवेच्या ऑप्शन्सवर क्लिक करावं लागेल. फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक आणि वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. तसंच या वेळी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागतील. आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक तपशील तपासल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूव केलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Driving license, While driving