जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Nitin Gadkari : इलेक्ट्रिक गाडी घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, नितीन गडकरींच महत्त्वाचं विधान

Nitin Gadkari : इलेक्ट्रिक गाडी घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, नितीन गडकरींच महत्त्वाचं विधान

Nitin Gadkari : इलेक्ट्रिक गाडी घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, नितीन गडकरींच महत्त्वाचं विधान

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढतो आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार आणि बाइकची निर्मिती वाहन कंपन्या करू लागल्या आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढतो आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार आणि बाइकची निर्मिती वाहन कंपन्या करू लागल्या आहेत. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलंय. पुढील वर्षापासून इलेक्ट्रिक वाहनं पेट्रोल वाहनांइतकीच स्वस्त होतील, असा अंदाज मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय. नितीन गडकरींनी 1 नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमादरम्यान देशभरात इलेक्ट्रिक बसेस पुन्हा सुरू करण्याची सरकारची योजना जाहीर करताना हे वक्तव्य केलं. त्यांच्या मते, भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत तब्बल 800% वाढ झाली आहे.

2022 मध्ये आतापर्यंत भारतात सुमारे 17 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. भारतात 1.5 लाख बसेस आहेत, त्यापैकी 93% डिझेलवर चालतात. यामध्ये अनेक बसेस या जुन्या आणि खराब आहेत. झिरो उत्सर्जनाचं लक्ष्य गाठण्यासाठी या सर्व बसेस इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचा सरकारचा विचार असल्याचं नितीन गडकरी या वेळी म्हणाले.

हे ही वाचा :  दिवाळीत मारूती सुझुकीचा धमाका! तब्बल 1.50 लाखांहून अधिक कारची विक्री, ‘ही’ ठरली सर्वाधिक पसंतीची कार

भारतात हायड्रोजन कारचे काम सुरू

भारतात नजीकच्या काळात हायड्रोजनवर चालणाऱ्या कारची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हायड्रोजन बनवण्यासाठी सध्या ब्लॅक हायड्रोजन, ब्राऊन हायड्रोजन आणि ग्रीन हायड्रोजन अशा तीन पद्धती वापरल्या जातात. ब्लॅक हायड्रोजन बनवण्यासाठी कोळसा लागतो, ब्राऊन हायड्रोजन बनवण्यासाठी पेट्रोल आणि ग्रीन हायड्रोजन बनवण्यासाठी पाण्याची गरज असते, असंही नितीन गडकरींनी सांगितलं.

बसचं भाडं होणार कमी

गडकरींच्या मते, भारतातील पर्यटन वाढवण्यासाठी सरकार डबल-डेकर बसेसची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. ऑटो अ‍ॅवॉर्ड्स 2022 मध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, सरकार एसी डबल-डेकर बसेसच्या तिकिटांची किंमत कमी करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून त्या सर्वसामान्यांना अधिक परवडणाऱ्या असतील.

हे ही वाचा :  कार घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आजपासून बदलला नियम

या शहरांसाठी बांधण्यात येणार ‘ग्रीन एक्सप्रेस वे’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पूर्वी नागपूर ते पुणे ग्रीन एक्स्प्रेस वे बांधण्याची घोषणा केली आहे. यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ 8 तासांपर्यंत कमी होईल. सध्या या प्रवासाला सुमारे 14 तास लागतात. नागपूर ते पुणे प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नवीन पुणे-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अॅक्सेस कंट्रोल ‘ग्रीन एक्स्प्रेस वे’शी जोडला जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात