मुंबई : सध्या नेटफ्लिक्स हा जगातील सर्वात लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म बनला आहे. विविध विषयांच्या वेबसीरिज, मूव्हीज, डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी लोक नेटफ्लिक्सला पसंती देत आहेत. नेटफ्लिक्सनं आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. नेटफ्लिक्सनं बुधवारी जाहीर केलं की, भारतातील व्यवसाय धोरणाच्या यशानंतर कंपनीनं 116 देशांमध्ये सबस्क्रिप्शन प्राईज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सनं 2021 मध्ये भारतात कमी किमतीचं सबस्क्रिप्शन पॅकेज सादर केलं होतं. तेव्हापासून भारतात ग्राहकांच्या सहभागामध्ये 30 टक्के आणि एकूण उत्पन्नात एका वर्षांत 24 टक्के वाढ झाली आहे. ‘डीएनए’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेशननं भारतीय बाजारपेठ अधिक अनुकूल करण्यासाठी आणि युजर्सची संख्या वाढवण्यासाठी सबस्क्रिप्शन फी 20 ते 60 टक्क्यांनी कमी केली आहे. कंपनीचे को-चीफ एक्झिक्युटिव्ह टेड सॅरंडोस यांनी अर्निंग्ज कॉलदरम्यान सांगितलं की, “भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे कारण येथे मनोरंजनप्रेमी लोकांची लोकसंख्या प्रचंड आहे. त्यांना आवडणारं प्रॉडक्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
काय सांगता! आता नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर केला तर होईल तुरुंगवास, नवा नियम काय?म्हणून, आम्ही सर्जनशीलतेचा वापर करत आहोत आणि युजर्सना अधिक चांगली सबस्क्रिप्शन किंमत देण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतात सतत प्रगती करत राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. युजर्सना लोकल कंटेंट जास्त आवडत असल्यानं भारत ही एक अतिशय विशिष्ट बाजारपेठ आहे. शिवाय, आपण पहात आहात की येथील लोकल कंटेंट नेहमीपेक्षा जास्त प्रसिद्ध होत आहे.”
सॅरंडोस यांनी ऐतिहासिक चित्रपट ‘आरआरआर’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’च्या यशाचा उल्लेख केला. हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये रिलिझ झाल्यानंतर स्ट्रीम करण्यात आले होते. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या क्षमतेसोबत कंटेंटची संधी अजूनही वाढत आहे, हे यातून दिसून येतं.
आता तुम्ही कुणालाही शेअर करु शकत नाही नेटफ्लिक्सचा पासवर्ड?“आम्ही भारतात चांगली कामगिरी करू शकतो. सध्या आम्ही त्यापासून खूप लांब आहोत. त्यामुळे आम्ही अजून जास्त गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं की, आम्ही भारतात नक्कीच चांगली कामगिरी करू,” असंही सॅरंडोस पुढे म्हणाले. पूर्वी 199 प्रतिमहिना किंमत असलेला नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन आता केवळ 149 मिळत आहे. तर, मोबाईल वगळता इतर कोणत्याही एका डिव्हाइसवर सर्व चालणाऱ्या बेसिक सबस्क्रिप्शनची किंमत 499 ऐवजी 199 करण्यात आली आहे. आशिया, युरोप, लॅटिन अमेरिका, सब-सहारा प्रदेशातील आफ्रिकन देश आणि मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये या किमती कमी करण्यात आल्या आहेत. राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे कुटुंब अतिरिक्त खर्चांमध्ये कपात करत आहेत. शिवाय, नेटफ्लिक्सला आपल्या प्रतिस्पर्धी सेवांकडून अधिक स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. आर्थिक वर्ष 2022 साठी ओव्हर-द-टॉप प्लेअर्सच्या एकूण कमाईपैकी 5 टक्के पेक्षा कमी कमाई ज्या देशांतून आली त्या ठिकाणी किमती कमी करण्यात आल्या आहेत. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तीन महिन्यांत, नेटफ्लिक्सचं जागतिक निव्वळ उत्पन्न मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळजवळ 18 टक्क्यांनी कमी झालं आहे. त्यात 1 हजार 305 दशलक्ष डॉलर्सची (सुमारे 107 कोटी) घट झाली आहे. असं असलं तरी, नेटफ्लिक्सचा महसूल मार्च 2022 च्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या तिमाहीत 3.7 टक्क्यांनी वाढून 8 हजार 162 दशलक्ष डॉलर्सवर (अंदाजे 671 कोटी रुपये) पोहोचला आहे.