मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता तुम्ही कुणालाही शेअर करु शकत नाही नेटफ्लिक्सचा पासवर्ड?

आता तुम्ही कुणालाही शेअर करु शकत नाही नेटफ्लिक्सचा पासवर्ड?

तुम्हीही शेअर केलाय का नेटफ्लिक्सचा पासवर्ड? मग हा नवा अपडेट तुम्हाला माहिती हवाच नाहीतर...

तुम्हीही शेअर केलाय का नेटफ्लिक्सचा पासवर्ड? मग हा नवा अपडेट तुम्हाला माहिती हवाच नाहीतर...

तुम्हीही शेअर केलाय का नेटफ्लिक्सचा पासवर्ड? मग हा नवा अपडेट तुम्हाला माहिती हवाच नाहीतर...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : नेटफ्लिक्स ही लोकप्रिय स्ट्रीमिंग सेवा आपल्या प्लॅटफॉर्मवरचं पासवर्ड शेअरिंग थांबवण्याबाबत एक नवीन अपडेट जारी करत आहे. स्ट्रीमिंग जायंटने आपलं 'हेल्प सेंटर पेज' अपडेट केलं आहे. या अपडेटनुसार आता फक्त एकाच कुटुंबातल्या व्यक्तींची अकाउंट्स शेअर करण्यायोग्य असतील.

    घरातल्या व्यक्तींची डिव्हाइसेस एकाच प्रायमरी लोकेशनशी संबंधित असल्याची खात्री करण्यासाठी, नेटफ्लिक्स आपल्या वापरकर्त्यांना दर 31 दिवसांनी एकदा आपलं अकाउंट वाय-फायशी कनेक्ट करण्यास सांगणार आहे. 'द स्ट्रिमेबल'ने दिलेल्या माहितीनुसार, आताही नेटफ्लिक्स अकाउंट्स शेअर करता येतील; पण ही अकाउंट्स फक्त एकाच कुटुंबातल्या व्यक्ती आपसात शेअर करू शकतील.

    अशा युझर्सची सर्व डिव्हायसेस प्रायमरी लोकेशनशी कनेक्टेड आहेत याची खात्री करण्यासाठी, नेटफ्लिक्स युझर्सना त्यांच्या प्रायमरी लोकेशनवर वाय-फायशी कनेक्ट होण्यास सांगत आहे. यासाठी आता युझर्सना 31 दिवसांतून एकदा तरी नेटफ्लिक्स अॅप किंवा वेबसाइट उघडून काही तरी बघावं लागेल.

    याशिवाय, एखाद्या युझरला कुटुंबातल्या सदस्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसोबत अकाउंट शेअर करायचं असेल तर त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील, असा पर्याय कंपनीने युझर्सना देऊ केला आहे. 'द स्ट्रीमेबल'च्या अहवालानुसार, फ्रीलोड करणारे युजर्स प्राधान्यक्रम, पसंती, नापसंती आणि इतर वैयक्तिक डेटा न गमावता त्यांची प्रोफाइल हिस्ट्री नवीन खात्यात हस्तांतरित करू शकतात.

    याव्यतिरिक्त, घरी नसलेल्या डिव्हाइसवर किंवा प्रवासात असताना नेटफ्लिक्स वापरण्यासाठी युझर्सना सात दिवसांसाठी अकाउंटमध्ये प्रवेश दिला जाईल. अशा प्रकारचं लॉग इन करण्यासाठी युझरला कंपनीकडे तात्पुरत्या कोडची मागणी करावी लागेल.

    तत्पूर्वी, ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत, नेटफ्लिक्सचे दोन नवीन सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (को-सीईओ) टेड सरांडोस आणि ग्रेग पीटर म्हणाले होते, की नेटफ्लिक्स टप्प्याटप्प्यानं नियमन केलेलं पासवर्ड शेअरिंग लागू करणार आहे; मात्र असं केल्यानंतर ग्राहकांच्या एक्सपिरिअन्सवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

    नेटफ्लिक्सशी संबंधित बातम्यांनुसार, नेटफ्लिक्सने जागतिक स्तरावर अँड्रॉइड डिव्हाइसेवर ‘किड्स मिस्ट्री बॉक्स’ फीचर आणलं आहे. हे फीचर, लहान मुलांना त्यांच्या आवडत्या मालिका आणि चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी एक मजेदार आणि सुरक्षित ठिकाण आहे.

    मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये केलेली आपल्या घोषणेची ब्लॉग पोस्ट कंपनीनं सोमवारी (1 जानेवारी) अपडेट केली आहे. यामध्ये नमूद केलं आहे, "हे फीचर आता जगातल्या सर्व सदस्यांसाठी अँड्रॉइड डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे. लहान मुलं, पालक आणि केअर गिव्हर्स 'किड्स प्रोफाइल'वर लॉग इन करून या फीचरचा आनंद घेऊ शकतात."

    "आम्ही आशा करतो, की मुलांना त्यांच्यासाठी रेकमेंड केलेला पुढचा शो किंवा चित्रपट बघताना आश्चर्य आणि आनंद वाटेल," असं स्ट्रीमिंग जायंट नेटफ्लिक्सने म्हटलं आहे.

    First published:

    Tags: Money, Netflix, Tech news, Technology