नवी दिल्ली, 2 एप्रिल: आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट व वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बरेच जण शेअरिंगमध्ये ओटीटी अॅपचं सबस्क्रिप्शन घेतात व मिळून ते वापरतात. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार यासारखे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. पण आता ओटीटी प्लॅटफॉर्मचा पासवर्ड शेअर करणं महागात पडू शकतं.
मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर पासवर्ड शेअर केल्याने तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. गेल्या काही वर्षांत मॅक्सएक्सचा वापर झपाट्याने वाढला आहे, परंतु तरीही लाखो लोक ज्या प्रकारे त्याचा वापर करत आहेत, त्यामुळे कंपनीला खूप नुकसान होत आहे. नेटफ्लिक्स युजर्स त्यांचा आयडी-पासवर्ड शेअर करतात आणि त्यामुळे कंपनीचे नुकसान होते. पण आता कायद्याने यावर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात 'झी न्यूज हिंदी'ने वृत्त दिलंय.
तुम्ही आता तुमच्या नेटफ्लिक्स अकाउंटचा पासवर्ड कोणाशीही शेअर केल्यास तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. कारण ओटीटी प्लॅटफॉर्मचा पासवर्ड शेअर करणं आता गुन्हा मानला जाणार आहे. यासाठी तुम्हाला तुरुंगवास किंवा मोठा दंड भरावा लागू शकतो. खरं तर, गेल्या काही वर्षांपासून, लोकांमध्ये पासवर्ड शेअर करण्याचा ट्रेंड खूप मोठा आहे, लोक एका अकाउंटचे सबस्क्रिप्शन घेतात आणि चार ते पाच लोक त्या अकाउंटवरून चित्रपट पाहतात. अशा परिस्थितीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे पासवर्ड शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Dream11 सारखे गेम खेलणाऱ्यांनो लक्ष द्या! तुमच्यासाठी सरकारने आणला नवा नियम
सरकारच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिसने अलीकडेच पायरसीबद्दल एक नवीन गाइडलाइन तयार केली आहे, ज्यानुसार तुम्ही कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचा पासवर्ड कोणत्याही व्यक्तीशी शेअर केल्यास तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे हा नियम फक्त नेटफ्लिक्ससाठी लागू होत नाही, तर मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी लागू होतो. पण, हा नियम भारतात नाही, तर यूकेमध्ये लागू करण्यात आला आहे.
यूकेमध्ये हा नवीन नियम करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कोणीही ओटीटी प्लॅटफॉर्मचा पासवर्ड इतरांशी शेअर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पासवर्ड शेअरिंगमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं आर्थिक नुकसान होत असल्याने हा नवीन नियम तयार करण्यात आला आहे. सध्या भारतात मात्र हा नियम लागू नाही, पण येत्या काळात या कंपन्या असे निर्णय इतर देशांच्या बाबतीतही घेऊ शकतात, ज्याअंतर्गत युजर्सना पासवर्ड शेअर करता येणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Netflix