जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / धोनीच्या घरातल्या नव्या पाहुणीची देशभर चर्चा, वाचा का आहे 'ती' इतकी खास?

धोनीच्या घरातल्या नव्या पाहुणीची देशभर चर्चा, वाचा का आहे 'ती' इतकी खास?

धोनीच्या घरातल्या नव्या पाहुणीची देशभर चर्चा, वाचा का आहे 'ती' इतकी खास?

महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता कायम आहे. धोनीच्या घरी दाखल झालेल्या नव्या पाहुणीची सध्या देशभर चर्चा आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 19 नोव्हेंबर : टीम इंडियाचा  माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी नं आयपीएलसोडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं दोन वर्ल्डकपसह अनेक स्पर्धा जिंकल्या. मैदानात आणि मैदानाच्या बाहेर ‘मिस्टर कुल’ अशी ओळख असलेल्या कारची मोठी आवड आहे.   धोनीने नुकतीच Kia EV6 Crossover ही इलेक्ट्रिक कार खरेदी केलीय. या कारची सध्या जोरदार चर्चा आहे. ही कार नेमकी कशी आहे? याबाबत  ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय. Kia EV6 क्रॉसओव्हर भारतात सीबीयू रूटने विकली जात आहे आणि कंपनीने सध्या भारतात फक्त 200 युनिट्स विकण्याची योजना आखली आहे. भारतातील वाढती मागणी पाहता कंपनी हा आकडा वाढवू शकते, परंतु आतापर्यंत कंपनीने अशी कोणतीही माहिती शेअर दिलेली नाही. ही कार फास्ट चार्जिंगसह अनेक चांगल्या फीचर्ससह येते. Kia EV6 Crossover चे अनेक व्हेरियंट भारतीय ऑटोमोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. यात टू व्हील ड्राइव्ह आणि फोर व्हील ड्राइव्हचा पर्याय आहे. टू व्हील ड्राइव्हची सुरुवातीची किंमत 59.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या कारमध्ये 229 PS पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क मिळते. ऑल व्हील ड्राइव्हची सुरुवातीची किंमत 64.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. आयुष्यात पाहिले नसतील एवढे पैसे धोनी टॅक्स म्हणून भरतो, आकडा ऐकून व्हाल थक्क कशी आहे बॅटरी? या कारमध्ये 77.4kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या विषयातील तज्ज्ञांच्या मते सिंगल चार्जमध्ये या कारला 708 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज मिळेल. यामध्ये 350 kW चा DC फास्ट चार्जर असेल. या कारची बॅटरी फक्त 18 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते. तुम्ही कारची बॅटरी 10 ते 80 मिनिटांत चार्ज करू शकता असे पर्यायही उपलब्ध आहेत. विराट कोहली पोहोचला चक्क पाकिस्तानात, मित्रांसोबत करतोय शॉपिंग; Video Viral धोनीचं कार कलेक्शन धोनीचं कार कलेक्शन खूप मोठं आहे. धोनीकडे अनेक आकर्षक कार आहेत. त्याच्याजवळ मर्सिडीज बेंझ जीएलई, लँड रोव्हर 3, ऑडी क्यू 7 आणि जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक या कारचा त्यामध्ये समावेश आहे. यासोबतच त्याच्याजवळ अनेक स्टायलिश आणि महागड्या बाईक्स आहेत. अनेकदा तो या बाईक राइड करताना दिसतो. दरम्यान, आता धोनीने त्याच्या कलेक्शनमध्ये नवीन इलेक्ट्रिक कारचा समावेश केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: car , MS Dhoni
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात