जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Virat Kohli: विराट कोहली पोहोचला चक्क पाकिस्तानात, मित्रांसोबत करतोय शॉपिंग; Video Viral

Virat Kohli: विराट कोहली पोहोचला चक्क पाकिस्तानात, मित्रांसोबत करतोय शॉपिंग; Video Viral

विराट कोहली

विराट कोहली

Virat Kohli: सध्या सोशल मीडियात फिरणारा विराटचा व्हिडीओ खरा आहे. तो खरंच पाकिस्तानात मित्रांसोबत शॉपिंगही करतोय. पण ही आजची गोष्ट नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 नोव्हेंबर: सध्या भारतीय संघातले सिनियर खेळाडू विश्रांती घेत आहेत. तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या सिनियर्सनी विश्रांती घेतली आहे. याचदरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराट आपल्या सहकाऱ्यांसोबत चक्क पाकिस्तानात पोहोचलाय आणि तिथे तो शॉपिंग करताना दिसतोय. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? विराटसोबत त्यात आणखी कोण कोण आहेत? याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो. अंडर 19 संघाची पाकिस्तानवारी तर सध्या सोशल मीडियात फिरणारा विराटचा व्हिडीओ खरा आहे. तो खरंच पाकिस्तानात मित्रांसोबत शॉपिंगही करतोय. पण ही आजची गोष्ट नाही. हा व्हिडीओ तब्बल 16 वर्षांपूर्वीचा आहे. 2006 साली भारताचा अंडर 19 संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी त्या संघात विराटसह अनेक युवा खेळाडूंचा समावेश होता. त्यावेळी पियुश चावला हा भारतीय टीमचा कॅप्टन होता. त्या टीममध्ये विराट, ईशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जाडेजा हे दिग्गज खेळाडूही होते. हेही वाचा -  Ind vs NZ: खेळ खल्लास! वेलिंग्टनमध्ये पावसाचा जोर वाढला, अम्पायर्सनी घेतला ‘हा’ निर्णय पाकिस्तानवारीत शॉपिंगची मजा दरम्यान याच दौऱ्यावेळी मोकळ्या वेळेत विराट आणि कंपनी पाकिस्तानातील एका मार्केटमध्ये फिरण्यास गेली होती. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत 17 वर्षांचा विराट कोहली स्पष्ट दिसतोय. त्याच्यासोबत इतर खेळाडूही या व्हिडीओत दिसत आहेत.

जाहिरात

पाक दौऱ्यात विराटची छाप विराटनं त्या दौऱ्यात दोन कसोटीत 172 धावा केल्या होत्या. तर तीन वन डेत 125  धावांचं योगदान दिलं होतं. पण त्यानंतर सिनियर टीम 2008 साली पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. तेव्हा मात्र विराटला संधी मिळाली नाही. त्यावेळी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केलं नव्हतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात