'मला कोव्हिड सेंटरमध्ये करमत नाही,' रुसलेले कोरोनाबाधित महाराज थेट रस्त्यावर येऊन बसले

'मला कोव्हिड सेंटरमध्ये करमत नाही,' रुसलेले कोरोनाबाधित महाराज थेट रस्त्यावर येऊन बसले

महाराज चक्क उस्मानाबाद शहरातील नगरपालिका समोर येऊन बसले.

  • Share this:

उस्मानाबाद, 15 ऑगस्ट : 'कोविड सेंटरमध्ये करमत नाही. जेवण चांगले मिळत नाही,' असा आरोप करत कोरोना बाधित असलेले महाराज रुसून चक्क रस्त्यावर येऊन बसल्याचा प्रकार उस्मानाबाद शहरात घडला आहे.

कळंब शहरातील एका महाराजांचा अहवाल 4 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उस्मानाबादमधील कोरोना सेंटरला ठेवण्यात आले होते. पण 'मला लोकांमध्ये मिळून मिसळून राहण्याची सवय आहे. या सेंटरमध्ये जेवण व्यवस्थित नाही. कोणाला भेटू देत नाहीत. मला या ठिकाणी राहायचे नसून मला गावी मठात परत जाऊ दे,' अशी मागणी करत महाराज चक्क उस्मानाबाद शहरातील नगरपालिका समोर येऊन बसले.

महाराजांच्या या कृत्यामुळे परिसरातील लोकांची व रुग्णालयातील कर्मचारी यांची चांगली धावपळ उडाली. या महाराजांना परत आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा कर्मचारी पीपीई किट घालून रुग्णवाहिका घेऊन रस्त्यावर. मात्र तरीही महाराज परत जाण्यास तयार नसल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली.

अखेर गावाकडे सोडतो या अटीवर तयार होऊन हे महाराज गाडीत बसण्यास तयार झाले व त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. कोरोना बाधित महाराज रस्त्यावर अचानकपणे आल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Published by: Akshay Shitole
First published: August 15, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या