जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / मर्सिडीजने जगभरातून त्यांच्या जवळपास 10 लाख गाड्या परत मागवल्या, काय आहे कारण?

मर्सिडीजने जगभरातून त्यांच्या जवळपास 10 लाख गाड्या परत मागवल्या, काय आहे कारण?

मर्सिडीजने जगभरातून त्यांच्या जवळपास 10 लाख गाड्या परत मागवल्या, काय आहे कारण?

मर्सिडीजच्या म्हणण्यानुसार, जरी ब्रेकिंग सिस्टममध्ये फारच कमी गंज आहे, परंतु असे झाल्यास, ब्रेक लावणे कठीण होईल, ज्यामुळे ब्रेक बूस्टर खराब होऊ शकतात आणि त्याने अपघाताची भीती आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जून : जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz ) जगभरातून त्यांच्या जवळपास दहा लाख गाड्या परत मागवल्या आहेत. यामागचे कारण वाहनांमधील ब्रेकिंग सिस्टिममधील (Breaking System) अडचण सांगितले जात आहे. फेडरल ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (KBA) ने 1 जून रोजी ही माहिती दिली. मात्र, ही बातमी उशिरा मीडियापर्यंत पोहोचली. मर्सिडीज-बेंझने परत मागवलेली वाहने 2004 ते 2015 दरम्यान तयार करण्यात आली आहेत. अहवालानुसार, परत मागवलेल्या गाड्यांमध्ये SUV मालिका MML, GL आणि R-क्लास लक्झरी मिनी व्हॅनचा समावेश आहे. KBA च्या मते, मर्सिडीजने एकूण 9,93,407 गाड्या परत मागवल्या आहेत, ज्यापैकी सुमारे 70,000 जर्मनीमध्ये आहेत. केबीएने म्हटले आहे की, वाहनांच्या ब्रेक बूस्टरला गंज चढत आहे जी चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे ब्रेक पेडल आणि ब्रेकिंग सिस्टीममधील समस्यांमुळे अपघात होऊ शकतात. मालमत्ता 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर का दिली जाते? मग मालकी कुणाकडे राहते? एएफपी या वृत्तसंस्थेकडून वाहने परत मागवल्याच्या वृत्ताला कंपनीने दुजोरा दिला आहे. वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे चौकशी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मर्सिडीजच्या म्हणण्यानुसार, जरी ब्रेकिंग सिस्टममध्ये फारच कमी गंज आहे, परंतु असे झाल्यास, ब्रेक लावणे कठीण होईल, ज्यामुळे ब्रेक बूस्टर खराब होऊ शकतात. यामुळे ब्रेक पेडल आणि ब्रेक सिस्टममधील कनेक्शनमध्ये खराब होऊ शकतं. Post Office Scheme: पैसे सुरक्षित आणि व्याजदरही जास्त; पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक ग्राहकांनी वाहने चालवू नका कंपनीने म्हटले आहे की ते आपल्या ग्राहकांना ब्रेकिंग सिस्टमची चाचणी पूर्ण होईपर्यंत वाहने न चालवण्याचे आवाहन करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाहने परत मागवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की रिकॉल केल्यानंतर, वाहनांची कसून तपासणी केली जाईल, त्यानंतर कोणताही भाग बदलण्याची गरज असेल तर ते बदलले जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात